'चेस मास्टर' विराट कोहलीचा जलवा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 विक्रम रचत इतिहास घडवला
(India vs Australia Champions Trophy 2025) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या उपांत्य सामन्यात जेव्हा टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून 265 धावांचे लक्ष्य मिळाले, तेव्हा सर्वांना अपेक्षा होती की या सामन्यात विराट कोहली संघाला विजयापर्यंत पोहोचवेल. ज्यात किंग कोहलीने कोणालाही निराश केले नाही. त्याने 98 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 84 धावा करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. केएल राहुलने षटकार मारून सामना संपवला, पण या खेळीदरम्यान किंग कोहलीने अनेक विक्रम केले आणि अनेक विक्रम मोडले. (Virat Kohli Records Champions Trophy 2025)
चॅम्पियन्स ट्राॅफी 2025: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमीफायनल सामन्यात विराटने केलेले विक्रम खालीलप्रमाणे
पहिला विक्रम म्हणजे, विराट आयसीसी एकदिवसीय स्पर्धेत सर्वाधिक वेळा 50+ धावा करणारा पहिला फलंदाज बनला. त्याने 24 वेळा हा टप्पा गाठला, सचिन तेंडुलकरच्या 32 वेळांच्या विक्रमाला मागे टाकले. (Most 50+ Scores in ICC Tournaments)
दुसरा विक्रम म्हणजे, आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीत 1000 पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्याने 53.84 च्या सरासरीने 1023 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे.
तिसरा विक्रम, तो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. 17 सामन्यांमध्ये 82.88 च्या सरासरीने 746 धावा केल्या असून त्यात एक शतक आणि सहा अर्धशतके आहेत.
चौथा विक्रम, एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना 8000 धावा करणारा सचिननंतर दुसरा फलंदाज बनला. त्याने 170 सामन्यांत 64.50 च्या सरासरीने 28 शतके झळकावली.
पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा विक्रम म्हणजे, लक्ष्याचा पाठलाग करताना संघाला विजय मिळवून देणारा तो सर्वश्रेष्ठ फलंदाज ठरला. त्याने 105 सामन्यांत 89.59 च्या सरासरीने 5913 धावा केल्या. (ICC ODI Tournament Records Virat Kohli)
(India vs Australia Semi Final Highlights 2025) सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने पराभव करत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 264 धावा केल्या, ज्यामध्ये स्टीव्ह स्मिथने 73 आणि अॅलेक्स केरीने 61 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने 3 बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल, विराट कोहलीच्या 84 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने 6 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. केएल राहुलने नाबाद 42 धावा करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
हेही वाचा-
IND vs AUS: कांगारूंची कंबर मोडली! भारताच्या विजयाचे 3 सर्वात मोठे हीरो
पीसीबीच्या आशा धुळीस, चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना पाकिस्तानमध्ये नाही, टीम इंडियाचा दणका.!!
टीम इंडीयाची विजयी घोडदौड; चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत 5व्यांदा प्रवेश
Comments are closed.