लंडनमधील रस्त्यावर कोहली ‘बापल्योक’ एकत्र, विराट कोहली आणि अकायचा व्हिडीओ व्हायरल
नवी दिल्ली : टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज आणि माजी कर्णधार सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. विराट कोहली त्याच्या कुटुंबासोबत लंडनमध्ये आहे. विराटचा आणि त्याचा लेक अकाय या दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराटच्या एका चाहत्यानं चित्रित केलेला व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून चाहत्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया त्यावर येत आहेत.
विराट कोहली त्याचा मुलगा अकायच्या जन्मापासून म्हणजेच फेब्रुवारी 2024 पासून लंडनमध्ये वास्तव्यास आहे. मुलांची प्रायव्हसी जपली जावी यासाठी विराट कोहली लंडनमध्ये शिफ्ट झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विराट कोहली आणि त्याचा मुलगा अकाय लंडनच्या रस्त्यावरुन चालत जाताना दिसतात. यावेळी विराट काही व्यक्तींसोबत संवाद साधताना पाहायला देखील मिळतो. व्हिडीओत अकाय विराट कोहलीचं बोट धरून चालत असल्याचं पाहायला मिळतं.
विराट कोहली आणि अकाय या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र, या व्हिडीओत अनुष्का शर्मा आणि वामिका दिसत नाहीत.
विराट कोहली येत्या काळात आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना पाहायला मिळेल. आयपीएल येत्या काही दिवसांमध्ये सुरु होणार आहे. तर, विराट कोहली टी 20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्यामुळं जून महिन्यात भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात वनडे मालिका होणार आहे. त्या मालिकेत विराट कोहली भारताकडून खेळताना पाहायला मिळेल.
दरम्यान, विराट कोहलीनं मंगळवारी सर्व चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विराटनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सर्वांना होळीच्या शुभेच्छा, रंगांचा सण प्रत्येकाच्या आयुष्यात यशाचे, आनंदाचे आणि सकारात्मकतेचे रंग भरो, असं विराट कोहलीनं म्हटलंय.
पाहा व्हिडीओ
लंडनच्या रस्त्यावर अकायसोबत विराट कोहली 🥰❤️ pic.twitter.com/plGfX6PHWt
— विराट कोहली फॅन क्लब (@Trend_VKohli) ३ मार्च २०२६
आणखी वाचा
Comments are closed.