विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video व्हायरल
भारत विरुद्ध सा. तिसऱ्या वनडे दरम्यान विराट कोहली आणि कुलदीप यादव: विराट कोहलीचा मैदानावर सतत मस्ती करताना दिसतो. कधी डान्स मूव्ह्स तर कधी सहकाऱ्यांची अॅक्टिंग करून सगळ्यांना हसवतो. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या वनडे सामन्यातही असाच एक मजेशीर प्रसंग पाहायला मिळाला.
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स!
भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेची पहिली डाव 270 धावांवर गुंडाळली. या डावात क्विंटन डी कॉकने शानदार 106 धावांची खेळी केली. पण खरं आकर्षण ठरलं ते कुलदीप यादवने कॉर्बिन बॉशला बाद करत आठवा विकेट घेतल्यानंतर घडलेलं दृश्य. विकेट पडल्यानंतर कुलदीपने विराटचा हात पकडला आणि दोघांनी मैदानातच ‘कपल डान्स’ करीत जोरदार सेलिब्रेशन केलं. त्यांचा हा मजेदार डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Virat Kohli And Kuldeep Yadav During Ind vs Sa 3rd ODI)
🔴 विराट कोहली + कुलदीप यादव = विकेटनंतर कपल-डान्स सेलिब्रेशन!
ही ऊर्जा फक्त कोहलीच आणू शकतो 😂🔥#INDvsSA #विराटकोहली #विकेट pic.twitter.com/KnMnnwkyKP— उत्कर्ष यादव (@utkarshyadav79) 6 डिसेंबर 2025
कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णाचा कहर…
भारत–दक्षिण आफ्रिका तिसरा वनडे सामना क्षणांनी भरलेला होता. नाणेफेक जिंकल्यानंतर के. एल. राहुल चांगलाच आनंदी दिसला, कारण तब्बल 20 सामन्यांनंतर टीम इंडियाने वनडेत टॉस जिंकला होता. भारतीय संघासाठी कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यानी प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिका पूर्ण 50 षटके खेळू शकली नाही आणि 270 धावांवर थांबली. या मालिकेत दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकला असून, तिसरा सामना जिंकणारा संघच मालिकेचा विजेता ठरणार आहे.
क्विंटन डी कॉकचे विकेटकीपर म्हणून सर्वाधिक शतके…
दक्षिण आफ्रिकेसाठी क्विंटन डी कॉक उत्तम फॉर्मात दिसला, तिसऱ्या वनडेमध्ये त्याने 106 धावांची शतकी खेळी केली. हे त्याच्या वनडे करिअरमधील 23 वे शतक होते. यामुळे तो ODI क्रिकेटमध्ये विकेटकीपर म्हणून सर्वाधिक शतके करणाऱ्या कुमार संगकाराच्या बरोबरीला पोहोचला आहे. भारताविरुद्ध वनडेमधील हे त्याचे सातवे शतक ठरले असून, या बाबतीत त्याने सनथ जयसूर्याच्या विक्रमाचीही बराबरी केली.
कोहली आता कुलदीपसोबत नाचत आहे😂❤️.pic.twitter.com/hW5DI8JnHf https://t.co/tWqAwAgpFC
— mutual.stark (@mutualstark) 6 डिसेंबर 2025
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.