IND vs SA: तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान कुलदीपसोबत विराटचा ‘कपल डान्स’, पाहा व्हिडिओ व्हायरल

विराट कोहलीची (Virat Kohli) स्टाईल खूपच खास आहे. तो मैदानावर नेहमीच मजा-मस्ती करत असतो. कधी डान्स करतो तर कधी कोणाची तरी नक्कल करतो. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Odi Series IND vs SA) तिसऱ्या वनडे (ODI) सामन्यातही असंच काहीसं घडलं.

भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 270 धावांवर गुंडाळला. या सामन्यात क्विंटन डिकॉकने 106 धावांची खेळी केली. कुलदीप यादवने कॉर्बिन बॉशला बाद करून दक्षिण आफ्रिकेला आठवा धक्का दिला. या विकेटनंतर विराट(Virat Kohli and Kuldeep Yadav’s funny dance) आणि कुलदीपने एकत्र येऊन ‘कपल डान्स’ केला. कुलदीप यादव आणि विराट कोहलीच्या या मैत्रीपूर्ण डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. बॉशची विकेट घेतल्यावर कुलदीपने विराटचा हात धरला आणि दोघांनी डान्स करून चाहत्यांचे मन जिंकले.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा वनडे सामना अशा मजेशीर क्षणांनी भरलेला होता. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार केएल राहुलही खूप उत्साहात होता, कारण भारतीय संघाने 20 सामन्यांनंतर प्रथमच टॉस जिंकला होता.

भारतीय संघासाठी कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी चार-चार विकेट्स घेतल्या. तसेच, दक्षिण आफ्रिकेचा संघ संपूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही आणि 270 धावांवर सर्वबाद झाला. या वनडे मालिकेत दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत आणि तिसरा सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल.

दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डिकॉक सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने तिसऱ्या वनडे सामन्यात 106 धावांची शतकी खेळी केली. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील 23 वे शतक होते. यामुळे तो वनडे सामन्यांमध्ये यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत कुमार संगकाराच्या बरोबरीने आला आहे. तसेच, भारताविरुद्धचे हे त्याचे 7 वे वनडे शतक होते. भारताविरुद्ध सर्वाधिक वनडे शतके करण्याच्या बाबतीत त्याने सनथ जयसूर्याची बरोबरी साधली आहे.

Comments are closed.