छोटा पॅकेट मोठा धमाका! वैभवच्या कामगिरीवर धोनी-कोहलीने दिली खास प्रतिक्रिया!
यंदाच्या आयपीएल हंगामातील 47वा सामना राजस्थान राॅयल्स विरूद्ध गुजरात टायटन्स (GT vs RR) संघात खेळला गेला. या सामन्यात अनेक रेकाॅर्ड तुटले गेले, तर अनेक नवे रेकाॅर्ड बनले. दरम्यान वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. गुजरातविरुद्ध फक्त 35 चेंडूत शतक ठोकून वैभवने इतिहास रचला.
वैभवने 38 चेंडूत 7 चौकार आणि 11 षटकारांसह 101 धावांची खेळी केली. एवढ्या कमी वयात वैभवने आपल्या दमदार कामगिरीने सर्वांना चकित केले. त्याच वेळी, एम धोनी आणि विराट कोहलीच्या वैभवबद्दलच्या प्रतिक्रियाही आता समोर आल्या आहेत. खरं तर, राजस्थान रॉयल्स संघाचे व्यवस्थापक रोमी भिंदर यांनी सोमवारी (28 एप्रिल) खुलासा केला की, वैभव सूर्यवंशीने अलीकडेच दिग्गज एमएस धोनीशी बातचीत केली होती.
गुजरातविरुद्धच्या सामन्यानंतर रोमी भिंदर यांनी स्पोर्ट्स टुडेशी बोलताना सांगितले की, “14 वर्षीय वैभव चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीला भेटला. हो, तो गुवाहाटीमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात धोनीला भेटला होता. तो पुन्हा सीएसके विरुद्धच्या आमच्या विरूद्ध सामन्यात त्याला भेटेल. पण मला दोघांमध्ये समान गुण दिसतात. दोघेही शांत आहेत, पण तरीही आक्रमक क्रिकेट शॉट्स खेळतात. त्यामुळे काही समानता आहेत.” राजस्थान रॉयल्स संघ व्यवस्थापक म्हणाले. “एमएस धोनीनेही त्याचे खूप कौतुक केले, तो म्हणाला, ‘ठीक आहे, तुमच्या संघात एक लहान मुलगा आहे. तो मुलगा प्रौढ खेळाडूसारखा उत्तम शॉट्स दाखवत आहे.”
याशिवाय रोमी भिंदरने असेही सांगितले की वैभवने कोहलीलाही भेट दिली होती. कोहलीने वैभवचे खूप कौतुक केले. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा चाहता असलेला वैभव राजस्थानच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यादरम्यान सुपरस्टारला भेटला. यादरम्यान विराट कोहलीने तरुण खेळाडूसोबत काही फलंदाजीच्या टिप्स शेअर केल्या. भिंदर म्हणाले, “वैभवला विराट कोहली खूप आवडतो. वैभव विराटला भेटला आणि काही टिप्स शेअर केल्या. विराटने त्याला जमिनीशी जोडून कसे राहायचे आणि नम्र राहून कठोर परिश्रम कसे करायचे हे देखील सांगितले.”
राजस्थान राॅयल्सचा पुढील सामना (1 मे) रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध घरच्याच मैदानावर होणार आहे. या सामन्यात देखील वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील. कारण या सामन्यात वैभव सूर्यवंशी भारताचा दिग्गज वैगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह तसेच न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांना कसे सामोरे जातो? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
Comments are closed.