कधीकाळी विराट-अनुष्काचं झालेलं ब्रेकअप, एकमेकांचं तोंडही न पाहण्याचं ठरवलेलं; मग सलमान खाननं…
विराट कोहली अनुष्का शर्मा: जेव्हा-जेव्हा सेलिब्रिटींच्या स्टार कपल्सची (Celebrity Couples) चर्चा होते, तेव्हा-तेव्हा विरुष्काचं (Virushka) नाव सर्वात आधी घेतलं जातं. अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) बॉलिवूड आणि क्रिडाविश्वातील जगप्रसिद्ध जोडप्यांपैकी एक. चाहते विराटला ‘किंग कोहली’ (King Kohli) म्हणतात, तर त्याची पत्नी अनुष्काला ‘क्वीन कोहली’ म्हणतात. विराट आणि अनुष्कानं 2017 मध्ये लग्नगाठ बांधलेली. ते जवळपास सहा वर्षांपूर्वी एका शॅम्पूच्या जाहिरातीच्या शूटिंगवेळी भेटलेले. कॅमेऱ्यावर नेहमीच हसत-खेळत दिसणारं हे जोडपं, चाहत्यांचं आवडतं स्टार कपल आहे. पण, तुम्हाला माहितीय का? विराट-अनुष्का आयुष्यभरासाठी लग्नाच्या बेडीत अडकण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचण्यापूर्वी एकदा वेगळे झालेले. दोघांचंही ब्रेकअप झालेलं.
विराट, अनुष्काचा ब्रेकअप झालेला?
अनुष्का आणि विराट यांच्या नात्यात अनेक अडचणी आलेल्या. पण, अखेर दोघांनीही एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि आज ते दोघेही एकमेकांसोबत आनंदानं राहतोय. असं म्हटलं जातं की, 2016 हे वर्ष दोघांसाठी कठीण होतं. त्या वर्षाच्या सुरुवातीला विरुष्काचं ब्रेकअप झालेलं. त्यांच्या वेगळं होण्याचं कारण कधीच समोर आलं नाही, पण दोघेही वेगळे झालेले. पण, काही काळानंतर दोघांमध्ये समेट झाला आणि आजही ते एकत्र आहेत.
सुरुवातीला अनुष्का, विराटबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मानं विराट कोहली आणि अनुष्काला पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला. पण, त्यानंतर अशी माहिती समोर आली की, ज्यावेळी अनुष्का सलमान खानसोबतच्या ‘सुल्तान’ सिनेमाचं शूटिंग करत होती, त्यावेळी भाईजाननं अनुष्का आणि विराटला एकत्र आणण्यासाठी खूप मोठी भूमिका बजावलेली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान अनुष्काला समजवायचा की, प्रेम एकदाच होतं, पण जर ते प्रेम खरं असेल तर ते प्रेम जप… सलमान खाननं दिलेला सल्ला अनुष्का शर्माला पटला. त्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं पुन्हा पॅचअप झालं.
दरम्यान, विराट आणि अनुष्काच्या लग्नाला आठ वर्ष झाली आहेत. दोघांनाही दोन मूलं आहेत. सध्या दोघेही आपल्या मुलांसोबत लंडनमध्ये राहतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा
Comments are closed.