विराट कोहलीचे पाकिस्तानविरुद्ध शतक! 5 मोठ्या रेकाॅर्डवर कोरले नाव
रविवारी (23 फेब्रुवारी) रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 6 गडी राखून धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 241 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात, भारतीय संघाने हे लक्ष्य केवळ 4 गडी गमावून गाठले. या सामन्यात दिग्गज विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीय संघासाठी शानदार शतक झळकावले. दरम्यान त्याने अनेक मोठे रेकाॅड्स देखील आपल्या नावावर केले.
चला तर मग या बातमीद्वारे आपण विराट कोहलीने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात केलेल्या 5 मोठ्या रेकाॅर्ड्सबद्दल जाणून घेऊया.
1) वनडे सामन्यात 14,000 धावा पूर्ण केल्या.- या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) वनडे सामन्यात आपल्या 14,000 धावा पूर्ण केल्या. सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांच्यानंतर वनडे क्रिकेटमध्ये 14,000 धावा करणारा विराट कोहली आता तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याने सर्वात जलद 14,000 धावा करण्याचा रेकाॅर्ड केला.
2) सर्वाधिक झेल घेण्याचा रेकाॅर्ड- विराट कोहलीने त्याच्या क्षेत्ररक्षणानेही सामन्यावर प्रभाव पाडला. त्याने 2 झेल घेतले आणि आता तो भारतासाठी वनडे सामन्यात सर्वाधिक झेल घेणारा फलंदाज बनला आहे. त्याने वनडे सामन्यात 158 झेल घेतले आहेत. याशिवाय, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविडच्या 333 झेलची बरोबरी केली आहे.
3) चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिले शतक- याआधी विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक झळकावले नव्हते. पण त्याने या सामन्यात ही कामगिरीही केली. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहलीचे हे आतापर्यंतचे पहिले शतक आहे.
4) वनडे कारकिर्दीतील 51वे शतक- विराट कोहलीने त्याच्या वनडे कारकिर्दीतील 51वे शतक झळकावले. तो आता 51 शतके करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. विराटने वनडे शतकांच्या बाबतीत सचिन तेंडुलकरला आधीच मागे टाकले होते आणि आता त्याने त्याचे 51वे वनडे शतक देखील झळकावले आहे.
5) आशिया कप, विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध शतके- विराट कोहली आता जवळजवळ सर्व प्रमुख स्पर्धांमध्ये पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारा खेळाडू बनला आहे. त्याने आशिया कप, विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध शतके झळकावली आहेत. विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अजून शतक केले नव्हते पण आता त्याने हा रेकाॅर्डही आपल्या नावावर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाची दमदार झेप; गुणतालिकेत पहिल्या स्थानावर मजल
कोहलीच्या स्पोर्ट्समॅनशिपची चर्चा! पाकिस्तानी खेळाडूंसाठी विराटचे प्रेम की खेळातील बंधुत्व?
IND vs PAK मॅचमध्ये गिलला आऊट करताच ‘या’ पाकिस्तानी गोलंदाजाची वादग्रस्त हरकत
Comments are closed.