IND vs AUS: निर्णायक सामन्यात विराट कोहलीची ऐतिहासिक कामगिरी! अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा फलंदाज

सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील (ICC Champions Trophy 2025) पहिला सेमीफायनल सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात रंगला होता. दरम्यान ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 265 धावांचे लक्ष्य ठेवले होते. तत्पूर्वी विराट कोहलीला (Virat Kohli) विनाकारण मोठा सामनावीर म्हटले जात नाही, त्याने हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या सेमीफायनलमध्ये (India vs Australia Semi Final 1) ऑस्ट्रेलियाविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीने शानदार खेळी केली.

विराट कोहलीने सेमीफायनलमध्ये 98 चेंडूत 84 धावा केल्या. दरम्यान त्याने उत्कृष्ट 5 चौकार मारले. यादरम्यान, विराटने लक्ष्याचा पाठलाग करताना त्याच्या वनडे कारकिर्दीतील 8,000 धावाही पूर्ण केल्या.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 265 धावांचे लक्ष्य ठेवले होते. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल अनुक्रमे 28 आणि 8 धावा करून बाद झाले. विराट कोहलीने श्रेयस अय्यरसोबत तिसऱ्या विकेटसाठी 91 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यादरम्यान, विराट कोहलीने लक्ष्याचा पाठलाग करताना वनडे क्रिकेटमध्ये 8,000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा विराट कोहली जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर विराट कोहलीच्या पुढे आहे. सचिन तेंडुलकरने लक्ष्याचा पाठलाग करताना वनडे सामन्यात 8,720 धावा केल्या आहेत. जगात फक्त 2 फलंदाज असे आहेत ज्यांनी वनडे सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना 8,000 धावा केल्या आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहलीने आणखी एक मोठा विक्रम केला. त्याने आयसीसी नॉकआउट सामन्यांमध्ये 1,000 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

लक्ष्याचा पाठलाग करताना फलंदाजाने काढलेल्या सर्वाधिक धावा- (एकदिवसीय)

सचिन तेंडुलकर (भारत) – ८७२० धावा
विराट कोहली (भारत) – 4003*
रोहित शर्मा (भारत) – 7115 हल्ला
सनथ जयसूर्या (श्रीलंका) – ५७४२ धावा
जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – ५५७५ धावा
विराट कोहलीने नॉकआउट सामन्यांमध्ये १००० धावा पूर्ण केल्या

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्माच्या विकेटने रितिका भावूक, तिची प्रतिक्रिया पाहून चाहतेही भावनिक!
गिलचा निर्णायक सामन्यात पुन्हा फ्लॉप शो; उपकर्णधारपद धोक्यात..!
पाकिस्तानचे नाटक सुरूच! ज्याला हटवणार होते त्यालाच बनवले प्रशिक्षक!

Comments are closed.