कोहलीकडून टीम इंडियाचं अभिनंदन, पण गंभीर-गिलला दुर्लक्ष; विजयाचं क्रेडिट कोणालं दिलं? सोशल मीडि

विराट कोहली पोस्ट नंतर इंडियन व्हीएस 5 व्या चाचणीनंतर: भारतीय संघाने ओव्हलमध्ये झालेला अंतिम टेस्ट सामना जिंकत इतिहास रचला आहे. या विजयानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण आहे. क्रिकेट चाहतेच नव्हे तर दिग्गजही युवा कर्णधार शुभमन गिल आणि संघाच्या खेळाडूंच्या खेळीचं भरभरून कौतुक करत आहेत. भारतीय संघाचे माजी कर्णधार विराट कोहली यांनीही संघाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या, मात्र त्यांच्या पोस्टमध्ये कोच गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिलचा उल्लेख नव्हता, हे विशेष लक्ष वेधून घेतंय.

पाचव्या कसोटीच्या अंतिम दिवसाचं थरारक दृश्य

द ओव्हलमध्ये झालेल्या पाचव्या आणि अंतिम टेस्ट सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी फक्त 4 विकेट्स हव्या होत्या, तर इंग्लंड फक्त 35 धावांवर विजयाच्या उंबरठ्यावर उभा होता. अशा निर्णायक क्षणी मोहम्मद सिराजने तुफानी गोलंदाजी करत 3 महत्वाचे विकेट्स घेतले. त्याआधी चौथ्या दिवशी प्रसिद्ध कृष्णाने जो रूटचा (105) महत्त्वाचा बळी मिळवून सामन्याचा मोर्चा भारताच्या बाजूने वळवला होता.

विराट कोहलीची सोशल मीडियावर प्रतिक्रिया

दरम्यान, भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहलीनेही त्याच्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना लिहिलं की, “टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय… सिराज आणि प्रसिद्धमुळे भारताला हा जबरदस्त विजय मिळवता आला. विशेषतः सिराजबद्दल सांगायचं झालं, तर त्याने स्वतःला पूर्णपणे संघासाठी झोकून दिलं. त्याच्यासाठी मला खूप आनंद होतोय…”

झेले रागावले आहेत

भारतीय संघाचा हा ऐतिहासिक विजय अनेकांनी उराशी बाळगावा असा आहे. मात्र, कोहलीच्या पोस्टमधून कर्णधार गिल आणि कोच गंभीरचा उल्लेख न झाल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. आता हे मुद्दाम टाळलेलं होतं का, की केवळ विसर पडला, हे कोहलीच सांगू शकतात. विराटच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. एक युजर म्हणाला, “तुम्ही शुभमन गिलच्या नेतृत्वाबद्दल एक शब्दही लिहिलं नाही, हे विसरलात वाटतं.” दुसऱ्याने लिहिलं, “गौतम गंभीर आणि गिलचा उल्लेखच नाही – तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.”

सामनावीर आणि मालिकावीर

या सामन्यातील सामनावीर म्हणून मोहम्मद सिराजची निवड झाली. त्याने दुसऱ्या डावात 5 आणि पहिल्या डावात 4 विकेट्स घेतल्या. भारताने हा सामना अवघ्या 6 धावांनी जिंकून मालिकेची 2-2 अशी बरोबरी साधली. तर मालिकावीर म्हणून शुभमन गिलची निवड झाली. त्याने या मालिकेत 4 शतकांच्या जोरावर एकूण 754 धावा  केल्या.

हे ही वाचा –

Ind vs Eng 5th Test : ‘अंगावर शहारे आले…’ भारताच्या थरारक विजयानंतर क्रिकेटविश्वात भावनांचा महापूर, तेंडुलकरपासून पंतपर्यंत, कोण काय म्हणालं?

आणखी वाचा

Comments are closed.