विराट कोहलीने पुन्हा एकदा रचला इतिहास! 'अशी' कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू
विराट कोहली सध्या भारतात असून तो दिल्ली संघाकडून विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत आहे. (24 डिसेंबर) रोजी बंगळुरू येथे दिल्ली आणि आंध्र प्रदेश यांच्यात सामना खेळला जात असून, या सामन्यात केवळ 1 धाव काढताच विराटने इतिहास घडवला आहे. या एका धावेसह विराट कोहली आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे.
या ऐतिहासिक कामगिरीमुळे विराट कोहलीने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 16000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. भारताकडून ही किमया करणारा तो सचिन तेंडुलकरनंतरचा दुसराच खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर लिस्ट-ए क्रिकेटमध्ये एकूण 21999 धावांची नोंद असून, आता विराट कोहली 16000 हून अधिक धावांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.
बातमी मिळेपर्यंत विराट कोहली अतिशय उत्कृष्ट लयीत दिसत असून तो 26 चेंडूंमध्ये 37 धावा करून खेळत आहे. कोहलीने आतापर्यंत आपल्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला आहे. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना आंध्र प्रदेशने निर्धारित 50 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 298 धावा केल्या आहेत. आंध्र प्रदेशकडून रिकी भुईने 105 चेंडूंत 122 धावांची शानदार खेळी केली. ध्येयाचा पाठलाग करताना दिल्लीने 11 षटकांत 111/1 धावा केल्या आहेत. कोहलीशिवाय प्रियांश आर्य 38 चेंडूत 72 धावा करून खेळत आहे
Comments are closed.