कोहलीचा चाहत्याचा रायपूरमध्येही मैदानात प्रवेश, सुरक्षारक्षकांकडून करेक्ट कार्यक्रम
रायपूर : विराट कोहलीनं कसोटी आणि टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. कोहली सध्या भारताच्या वनडे संघाचा भाग आहे. सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत विराट कोहली खेळतोय. विराट कोहलीनं पहिल्या वनडेत शतक केलं होतं त्यानंतर रांचीतला एक चाहता मैदानात आला होता. त्यानं धावत येत विराट कोहलीचे पाय धरले होते. दुसऱ्या मॅचमध्ये देखील तसंच घडलं, ड्रिंक्स ब्रेक सुरु असताना एक चाहता सुरक्षा रक्षकांना चुकवून मैदानात घुसला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं आणि उचलून मैदानाबाहेर नेलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर विराटच्या चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात विराट कोहलीच्या चाहत्याला सुरक्षा रक्षक फरफरटत नेताना दिसून येतात. जेव्हा सुरक्षा रक्षकांनी विराटच्या चाहत्याला खांद्यावर उचलून मैदानाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मैदानावरील प्रेक्षकांनी देखील त्याची मजा घेतली.
रांचीमध्ये देखील एक चाहता सुरक्षा रक्षकांना चकवा देत मैदानात घुसला होता. त्यानं थेट विराट कोहलीचे पाय धरले होते. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
विराट कोहलीला भेटण्यासाठी एका चाहत्याने रायपूरमध्ये सुरक्षेचा भंग केला आणि बघा कसा बाहेर काढला सुरक्षा 😭 pic.twitter.com/zj75rfyJYt
— विराट कोहली फॅन क्लब (@Trend_VKohli) ३ डिसेंबर २०२५
विराट कोहलीनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दुसऱ्या सामन्यात शतक केलं. विराट कोहलीचं हे वनडेतील 53 वं आंतरराष्ट्रीय शतक होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विराट कोहलीचं हे 84 वं शतक होतं. विराट कोहलीनं तिसऱ्या स्थानावर 46 वं शतक केलं.
दुसऱ्या वनडेत भारताचा पराभव
भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 358 धावा केल्या होत्या. विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडनं शतक केलं होतं. ऋतुराज गायकवाडनं 105 धावा केल्या होत्या. ऋतुराज गायकवाडनं वनडे क्रिकेटमधील पहिलं शतक केलं. तर, दुसरीकडे विराट कोहलीनं सलग दुसऱ्या वनडेत शतक केलं. दुसऱ्या वनडेत देखील केएल राहुलनं अर्धशतक केलं. भारतानं पहिल्यांदा 358 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेनं चार विकेटनं भारतावर विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेनं 50 व्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर विजयावर शिक्कामोर्तब केलं. दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमनं 110 धावा केल्या. यानंतर डेवाल्ड ब्रेविसनं 34 बॉलमध्ये 54 धावा करत मॅच दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं फिरवली. दुसरीकडे ब्रीत्झके यानं 68 धावा करत टीमला विजयापर्यंत पोहोचवलं.
आता तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत भारत आणि दक्षिण आफ्रिकेनं प्रत्येकी 1-1 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तिसरी वनडे विशाखापट्टणममध्ये होणार आहे. या मॅचमध्ये विजय मिळवणारा संघ मालिका जिंकेल.
आणखी वाचा
Comments are closed.