Champions Trophy: विराट कोहली अक्षर पटेलच्या पाया का पडला? कारण काय?

सध्याची आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या मेगा स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताने 249 धावा केल्या. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडचा संघ 205 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून वरुण चक्रवर्तीने (Varun Chakravarthy) सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

दरम्यान या सामन्यात असा एक वेळ अशी आली जेव्हा चाहते आश्चर्यचकित झाले. विराट कोहलीने (Virat Kohli) अक्षर पटेलच्या (Axar Patel) पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. तथापि, यामागील कहाणी खूपच रंजक आहे.

या सामन्यात डावखुरा अष्टपैलू अक्षर पटेलने फक्त एकच विकेट घेतली पण ती खूप मौल्यवान होती. त्याने न्यूझीलंडचा स्टार खेळाडू केन विल्यमसनला (Kane Williamson) बाद केले जो भारत आणि विजयातील एकमेव अडथळा होता.

भारताचे सामन्यावर पूर्ण नियंत्रण होते, तरी विल्यमसन भारतीय संघासाठी अडचणीचे कारण राहिला. तो 81 धावांवर फलंदाजी करत होता आणि जोपर्यंत तो क्रीजवर होता तोपर्यंत न्यूझीलंडच्या काही आशा जिवंत होत्या.

पण अक्षरने त्याच्या 10व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विल्यमसनला बाद केले. विल्यमसनने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो पूर्णपणे चुकला आणि विकेटच्या मागे केएल राहुलने यष्टी उडवून देण्यात कोणतीही चूक केली नाही. या विकेटसह भारताचा विजय निश्चित झाला. यानंतर, कोहलीला त्याचे हास्य आणि आनंद आवरता आला नाही. तो अक्षर पटेलच्या पायांना स्पर्श करू लागला. अक्षर पटेलही हसला आणि त्याला असे करण्यापासून रोखले.

महत्त्वाच्या बातम्या-

न्यूझीलंड विजयाच्या वाटेवर तोच ‘बापू’चा चेंडू फिरला आणि किवीचा खेळ संपला..!
भारताची विजयी हॅट्ट्रिक; न्यूझीलंडला हरवले, आता ऑस्ट्रेलियाशी लढत
IND vs NZ: चक्रवर्तीने घेतली न्यूझीलंडची फिरकी! भारताचा 44 धावांनी दमदार विजय

Comments are closed.