IND vs NZ: मैदानावर विराट कोहली स्वतःवरच भडकला! जाणून घ्या नेमकं काय घडलं, व्हिडिओ व्हायरल
विराट कोहली (Virat Kohli) जेव्हा मैदानावर असतो, तेव्हा तो संघासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देतो. फलंदाजी करताना तो प्रत्येक धाव चोरण्याच्या प्रयत्नात असतो, तर क्षेत्ररक्षण करताना प्रत्येक धाव वाचवण्यासाठी धडपडतो. मात्र, जर त्याच्याकडून एखादी चूक झाली, तर तो स्वतःवरच प्रचंड नाराज होतो. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा इंदूरच्या मैदानावर पाहायला मिळाला.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराट स्वतःवरच चिडलेला दिसत आहे. या व्हिडिओत दिसते की, एक चेंडू पकडण्यासाठी विराट वेगाने धाव घेतो आणि बॉलवर झडप घालतो. पण चेंडू उचलून वेगाने थ्रो करण्याच्या नादात दोन-तीन वेळा प्रयत्न करूनही तो बॉल त्याच्या हातात येत नाही. आपल्या या चुकीमुळे ‘किंग कोहली’ खूपच नाराज झाला आणि त्याने रागाच्या भरात चेंडूला लाथ मारण्याचाही प्रयत्न केला.
विराट कोहली त्याच्या या खेळीनंतर निराश दिसत आहे.
खेळाप्रती त्याची बांधिलकी 🙌🏻🔥pic.twitter.com/Bmc2MBmyEj
— सुप्रविरत (@Mostlykohli) 18 जानेवारी 2026
तिसऱ्या वन-डे सामन्यात कर्णधार शुबमन गिलने (Shubman gill) नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला फलंदाजीसाठी बोलावले. भारतीय गोलंदाजांनी सुरुवात तर दणक्यात केली होती. अर्शदीपने पहिल्याच ओव्हरमध्ये हेन्री निकोल्सला शून्य धावांवर बाद केले. तर हर्षित राणाने दुसऱ्या ओव्हरमध्ये डेव्हन कॉनवेला तंबूत धाडले आणि 30 धावांवर खेळणाऱ्या विल यंगलाही बाद केले.
13 व्या षटकांमध्ये 3 विकेट्स घेतल्यावर भारतीय गोलंदाज मधल्या षटकांमध्ये पुन्हा एकदा विकेट्स काढण्यासाठी झगडताना दिसले. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच याही सामन्यात मिडल ओव्हर्समध्ये विकेट्स मिळाल्या नाहीत. डॅरिल मिचेलने सलग दुसरे शतक झळकावत पाय रोवून फलंदाजी केली, तर ग्लेन फिलिप्सनेही त्याला साथ देत भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
Comments are closed.