कोहली असता तर त्याच्या बापानेही एक रन काढून….स्टीव्ह स्मिथने बाबर आझमची अब्रू वेशीवर टांगली,
स्टीव्ह स्मिथ विरुद्ध बाबर आझम यावर बासित अलीची प्रतिक्रिया बीबीएलमधील एका सामन्यात बाबर आझमसोबत घडलेल्या घटनेवरून मोठा वाद पेटला असून, यावर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी परखड प्रतिक्रिया दिली आहे. सिडनी सिक्सर्स आणि सिडनी थंडर यांच्यातील सामन्यात ही घटना घडली. बाबर आझम सुमारे 40 धावांवर फलंदाजी करत असताना 11व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याला सिंगल घ्यायचा होता. मात्र, नॉन-स्ट्रायकर एंडवर उभ्या असलेल्या स्टीव्ह स्मिथने सिंगल घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे बाबर नाराज झाला.
यानंतर स्मिथने पुढच्याच षटकात तुफानी फलंदाजी करत तब्बल 32 धावा ठोकल्या. दुसरीकडे, बाबर 13व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. बाद झाल्यानंतर तो नाराज होता, त्याने त्यावेळी सीमारेषेवर बॅट आपटली, ज्यामुळे हा वाद आणखी चिघळला. या घटनेनंतर पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कामरान अकमल यांनी स्मिथच्या वागणुकीवर टीका केली. यूट्यूबवर प्रतिक्रिया देताना अकमल म्हणाले, “स्मिथने ज्या हावभावात बाबरला सिंगल घेऊ दिला नाही, ते योग्य नव्हते. हा बाबरचा अपमान आहे. स्मिथला सिंगल नको होता, तर तो आधीच बाबरला सांगू शकला असता. अशा पद्धतीने वागणे चुकीचे आहे.”
अकमल पुढे म्हणाले, “जर सिडनी सिक्सर्स बाबरवर समाधानी नसतील, तर त्याला संघातून बाहेर काढा. पण अशा प्रकारे त्याचा अपमान करू नका. त्याला बाहेर बसवा.” मात्र, याच्या उलट भूमिका घेत पाकिस्तानचे आणखी एक माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी संपूर्ण घटनेला बाबरलाच जबाबदार धरले. त्यांनी म्हटले की, “या सगळ्यासाठी बाबरच जबाबदार आहे. स्मिथने पुढच्या षटकात जे केलं, त्यातून त्याने स्वतःला सिद्ध केलं. एक क्षण असा वाटला की तो त्या षटकात सहा षटकार मारेल.”
आज बाबर आझम ऐवजी विराट कोहली असता तर स्टीव्ह स्मिथच्या वडिलांनीही एकच घेतली असती 🤣
असं पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अलीने म्हटलं आहे.
बीबीएलमधील एका सामन्यादरम्यान, स्टीव्ह स्मिथने शेवटच्या चेंडूवर बाबर आझमकडून एकल घेण्यास नकार दिला, ज्याने… pic.twitter.com/TF3QnAAWQv— अन्नू (@yaduanuja) १७ जानेवारी २०२६
बासित अली पुढे म्हणाले, “जर बाबरच्या जागी विराट कोहलीने सिंगल मागितला असता, तर स्टीव्ह स्मिथच्या बापही सिंगल घेतला असता.” तसेच त्यांनी बाबरवर टीका करत म्हटले, “तू तुझ्या खेळामुळेच स्वतःची किंमत कमी केली आहेस. यामुळे पाकिस्तानची बदनामी झालेली नाही. असे म्हणणारे मूर्ख आहेत. बाबर बिग बॅशमध्ये गेला कारण त्याला आमंत्रण होतं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला तिथे पाठवलेलं नव्हतं.” या घटनेमुळे बीबीएलसह आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात बाबर आझमच्या भूमिकेवर आणि स्टार खेळाडूंमधील अहंकारावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.