विराट कोहलीने उघड केली यशाची गुरुकिल्ली! विजयानंतर दिले थेट उत्तर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आयपीएल 2026 च्या पहिल्याच सामन्यात आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आरसीबीने सनराइजर्स हैदराबादविरुद्धच्या उच्च धावसंख्येच्या सामन्यात सहा विकेट्सने विजय मिळवत आपल्या मोहिमेची सुरुवात शानदार केली.

हैदराबादने दिलेल्या 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोहलीने नाबाद 69 धावांची खेळी साकारली. त्याला देवदत्त पड्डीकलची 26 चेंडूंमध्ये 61 धावांची स्फोटक खेळी उत्तम साथ मिळाली. या दोघांच्या भागीदारीमुळे आरसबीने अवघ्या 15.4 षटकांत 4 गडी गमावत 203 धावा करत सामना सहज जिंकला.

सामन्यानंतर कोहलीने आपल्या पुनरागमनाबद्दल समाधान व्यक्त केले. त्याने सांगितले की, विश्रांतीनंतर मैदानात परतताना ताजेतवाने वाटत आहे. गेल्या वर्षी आयपीएल अंतिम सामना खेळल्यानंतर आणि अलीकडील एकदिवसीय मालिकेतील फलंदाजीमुळे लय मिळवण्यास मदत झाली, असे त्यांनी नमूद केले.

आंतरराष्ट्रीय टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या कोहलीने आपल्या फिटनेस आणि तयारीबद्दलही भाष्य केले. त्याने स्पष्ट केले की, गेल्या अनेक वर्षांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे थकवा अधिक जाणवत होता, त्यामुळे मिळालेल्या विश्रांतीमुळे तो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अधिक ताजेतवाने झाला आहे. “मी प्रत्येक वेळी मैदानात उतरतो तेव्हा 120 टक्के देण्याचा प्रयत्न करतो,” असे त्याने सांगितले.

कोहलीने पडिक्कलच्या खेळीचेही विशेष कौतुक केले. तो म्हणाली की, पावरप्लेमध्ये आक्रमक खेळण्याचा त्याचा उद्देश होता, मात्र पडिक्कलच्या आक्रमक फलंदाजीमुळे त्याला अधिक स्ट्राइक देण्याचा निर्णय घेतला. पडिक्कलने खेळलेली शानदार खेळी सामना आरसबीच्या बाजूने झुकवण्यात निर्णायक ठरली, असेही कोहलीने स्पष्ट केले.

या विजयामुळे आरसबीने आयपीएल 2026 मध्ये विजयी सुरुवात करत चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. कोहलीच्या फॉर्ममुळे संघाचा आत्मविश्वासही अधिक बळकट झाला असून पुढील सामन्यांसाठी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.

Comments are closed.