23 वर्षांच्या ब्युटिफुल अ‍ॅक्ट्रेसचा फॅन आहे विराट कोहली? ग्लॅमरस फोटो लाईक केल्यामुळे ट्रोल

विराट कोहली अवनीत कौर पोस्ट पसंत करण्यापेक्षा विधान जारी करते: बऱ्याचदा सोशल मीडियावर (Social Media) नकळत काहीतरी घडतं, ज्यामुळे मोठी खळबळ माजते. क्रिकेटपटू विराट कोहलीसोबतही (Virat Kohli) असंच काहीसं घडलं. विराट कोहली हा इंस्टाग्रामवर (Instagram) सर्वाधिक फॉलोअर्स असलेला सेलिब्रिटी, त्याला 271 मिलियन लोक फॉलो करतात. पण, एवढे फॉलोअर्स असूनही विराट इन्स्टावर एवढा अॅक्टिव्ह नसतो, फारशा पोस्ट तो टाकत नाही. त्याच्या इन्स्टाग्रामवर पाहिलं तर, त्याची शेवटची पोस्ट म्हणजे, त्याची पत्नी अनुष्का शर्माला तिच्या वाढदिवशी दिलेल्या शुभेच्छांची. त्यानंतर विराटनं एकही पोस्ट केलेली नाही. पण, विराटनं स्वतःच्या अकाउंटवर पोस्ट केलेली नसली, तरीसुद्धा एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या फोटोला मात्र विराटनं लाईक केलं आहे. आता या लाईकमुळेच विराट कोहली चर्चेत आला आहे.

टीम इंडियाची रन मशिन विराट कोहली सध्या अभिनेत्री अवनीत कौरच्या (Avneet Kaur) पोस्टला लाईक करण्यासाठी सर्वाधिक चर्चेत आहे, जे लोकांनी पाहिल्याबरोबर स्क्रीनशॉट घेतला आणि सोशल मीडियावर एकच वादळ आलं. दरम्यान, क्रिकेटपटूनं आता यावर स्पष्टीकरण देखील दिलं आहे.

अलिकडेच, अवनीत कौरच्या एका पोस्टला विराट कोहलीच्या हँडलवरून लाईक मिळाला आणि तो लगेच काढूनही टाकण्यात आला. सोशल मीडियावर वेळ घालवणाऱ्यांसाठी हे पुरेसं होतं. ज्यांनी ज्यांनी ते पाहिलं त्यांनी त्यांनी पटापट स्क्रिनशॉर्ट काढले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. आता सोशल मीडियावर याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. या पोस्टमध्ये अवनीत कौर हिरव्या रंगाच्या क्रॉप टॉप आणि प्रिंटेड स्कर्टमध्ये क्लासी पोज देताना दिसत आहे.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा कमेंटचा महापूर

यामुळे, पोस्टवर लोकांच्या कमेंट्सचा पाऊस पडू लागला. लोक म्हणू लागले की, विराट कोहली साहेब, हे काय होतं? तसेच कुणी म्हटलंय की, कोण-कोण विराट कोहलीचं लाईक पाहण्यासाठी इथे आलं होतं? तसेच, कोणीतरी खोडकरपणे विचारलंय की, कोहलीचं लाईक कुठंय? काहींनी म्हटलंय की, कोहलीनं लाईक परत घेतलंय.


विराट कोहलीचं ठळक अक्षरात स्पष्टीकरण

अवनीक कौरच्या फोटोला विराटनं लाईक केल्याचा स्क्रिनशॉर्ट जोरदार व्हायरल होत आहे. आता विराट कोहलीनं यावर स्पष्टीकरण दिलं आहे, विराट कोहली म्हणालाय की, मी हे स्पष्ट करू इच्छितो की, माझं फीड क्लिअर करताना, अल्गोरिदमनं चुकून एक इंटरॅक्शन रजिस्टर केलीय. यामागे कोणताही हेतू नाही. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही कोणतीही अनावश्यक बाब गृहीत धरू नका. समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.”

अननीत कौर कोण?

अवनीत कौर ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अत्यंत लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामवर तिचे 31 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत, जिथे ती नियमितपणे आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अपडेट्स शेअर करते. अवनीतनं 2010 मध्ये ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’ या रिअॅलिटी शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ‘डान्स के सुपरस्टार्स’ (2011) आणि ‘झलक दिखला जा’ (2012) मध्येही भाग घेतला. तिने ‘मेरी मां’ (2011) या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि ‘चंद्र नंदिनी’ (2017) व ‘अलादीन – नाम तो सुना होगा’ (2018–2020) या मालिकांमधून प्रसिद्धी मिळवली.चित्रपट क्षेत्रात तिने ‘मर्दानी’ (2014) या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर ‘मर्दानी 2’ (2019), ‘टीकू वेड्स शेरू’ (2024) आणि ‘लव की अरेंज मैरिज’ (2024) यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

House Arrest Contestant Gehana Vasisth On Controversy: प्रियांका चोप्रा, राधिका आपटे कपडे काढून सिनेमात दिसतात ते कसं चालतं ? ‘हाऊस अरेस्ट’ मधील अभिनेत्रीचे खडे सवाल

अधिक पाहा..

Comments are closed.