या कारणांमुळे विराट कोहली, केएल राहुल नाही खेळणार रणजी ट्रॉफी, बीसीसीआय खपवून घेणार?
टीम इंडियाचे स्टार फलंदाज विराट कोहली आणि केएल राहुल यांनी रणजी ट्रॉफी न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही खेळाडूंनी स्थानिक स्पर्धेत भाग न घेण्यामागे दुखापतीचे कारण सांगितले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीनंतर बीसीसीआयने टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेणे अनिवार्य केले होते. मीडिया रिपोर्टनुसार, कोहलीने मानेच्या दुखण्यामुळे रणजी ट्रॉफी न खेळण्याचा निर्णय घेतला आहे आणि राहुलने कोपराच्या दुखापतीमुळे न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाला त्यांच्या दुखापतींबद्दल माहिती दिली आहे. रणजी ट्रॉफीचा दुसरा टप्पा 23 जानेवारीपासून सुरू होत आहे.
सिडनीमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी संपल्यानंतर तीन दिवसांनी 8 जानेवारी रोजी कोहलीला मानदुखीचा त्रास होत होता. कोहलीने बीसीसीआयच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सांगितले की त्याला अजूनही वेदना होत आहेत, ज्यामुळे त्याला आता राजकोटमध्ये सौराष्ट्र विरुद्ध दिल्लीच्या सामन्यात मुकावे लागणार आहे. तर दुसरीकडे राहुलला कोपराची दुखापत झाली आहे. ज्यामुळे तो बेंगळुरूमध्ये कर्नाटक विरुद्ध पंजाबच्या सामन्यातून बाहेर पडला आहे.
🚨 रणजी ट्रॉफीमध्ये विराट कोहली आणि केएल राहुल नाही 🚨
– विराट कोहली आणि केएल राहुल पुढील रणजी सामन्यासाठी उपलब्ध नाहीत. कोहलीला मान दुखत होती आणि केएलला कोपराच्या समस्या होत्या. (ESPNcricinfo). pic.twitter.com/CBY0xv5SiE
— तनुज सिंग (@ImTanujSingh) 18 जानेवारी 2025
या आठवड्याच्या सुरुवातीला, बीसीसीआयने सर्व खेळाडूंसाठी 10 कठोर नियमांची यादी जारी केली होती. ज्यात एक नियम असा पण आहे की, खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक आहे. पण जर एखादा खेळाडू खेळण्यासाठी उपलब्ध नसेल तर त्याला राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागेल.
दरम्यान विराट कोहली आणि केएल राहुल यांना 30 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पुढील सामन्यात खेळण्याची संधी असेल. जर दोघेही तंदुरुस्त असतील तर ते इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी हा 4 दिवसांचा सामना खेळू शकतात. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
हेही वाचा-
vinod kambli birthday special; विनोद कांबळीचा हा रेकाॅर्ड मोडणे अशक्य! जवळपासही कोणी नाही
टीम इंडियात जागा मिळेना, या भारतीय क्रिकेटपटूनं सुरू केली स्वत:ची स्पोर्ट्स अकादमी
महिला टी20 वर्ल्डकपला आजपासून सुरुवात; जाणून घ्या कधी, कुठे पाहायचा थेट सामना
Comments are closed.