फक्त 4 धावा अन् विराट कोहली रचणार इतिहास; राहुल द्रविडचा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर!
इंग्लंडविरुद्धच्या IND VS ENG दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ODI भारताचा स्टार फलंदाज VIRAT KOHLI विराट कोहलीकडे एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित करण्याची सुवर्णसंधी आहे. कार्डिफ येथे होणाऱ्या या सामन्यात त्याने केवळ 4 धावा केल्यास, तो दिग्गज भारतीय फलंदाज RAHUL DRAVID राहुल द्रविडचा मोठा विक्रम मागे टाकेल आणि इंग्लंडच्या भूमीवर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा भारतीय फलंदाज बनेल.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना 16 जुलै रोजी कार्डिफमधील सोफिया गार्डन्स येथे होणार आहे. पहिला सामना जिंकल्यामुळे भारतीय संघ मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे, शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. त्याच वेळी, विराट कोहलीचे लक्ष एका विशेष विक्रमाकडे असेल.
विराट कोहलीच्या नावावर सध्या इंग्लंडमध्ये खेळाच्या तिन्ही प्रकारांत मिळून एकूण 2642 आंतरराष्ट्रीय धावा आहेत. याउलट, राहुल द्रविडने 1996 ते 2011 या काळात इंग्लंडमध्ये खेळलेल्या 46 सामन्यांमधील 56 डावांत 2645 धावा केल्या होत्या.
त्यामुळे, जर विराटने कार्डिफमधील एकदिवसीय सामन्यात केवळ 4 धावा केल्या, तर त्याची एकूण धावसंख्या 2646 होईल; यामुळे तो राहुल द्रविडला मागे टाकून इंग्लंडमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा भारतीय फलंदाज बनेल.
आतापर्यंत, विराट कोहलीने इंग्लंडमध्ये खेळलेल्या 58 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील 74 डावांत 2642 धावा केल्या आहेत. या एकूण धावसंख्येत कसोटी क्रिकेटमधील 1096 धावा, एकदिवसीय सामन्यांमधील 1354 धावा आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील 192 धावांचा समावेश आहे.
इंग्लंडमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारे भारतीय फलंदाज:
राहुल द्रविड – 2645 धावा
विराट कोहली – 2642 धावा
सचिन तेंडुलकर – 2626 धावा
रोहित शर्मा – २२९८ धावा
एजबॅस्टन येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याला केवळ 5 धावा करता आल्या. असे असूनही, भारताने २५९ धावांचे लक्ष्य सहा गडी राखून यशस्वीपणे गाठत सामना जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, विराट कोहलीकडे आपला फॉर्म परत मिळवण्याची तसेच एक मोठा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित करण्याची संधी आहे.
Comments are closed.