IPL 2026: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहलीची दमदार एंट्री, पर्पल कॅपसाठी भुवनेश्वर कुमार आघाडीवर

आयपीएलमधील ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यत दिवसेंदिवस अधिकच रोमांचक होत चालली आहे. सोमवारी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) उत्कृष्ट कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्सचा त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव केला. या विजयानंतर, विराट कोहलीने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत थेट चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे, तर भुवनेश्वर कुमारने पर्पल कॅपच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.

या हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या अभिषेक शर्माच्या नावावर आहे. सनरायझर्स हैदराबादच्या या फलंदाजाने ८ सामन्यांमध्ये ३८० धावा कुटल्या आहेत; ज्यामध्ये एका शतकाचा आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. ३५८ धावांसह के.एल. राहुल दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.

वैभव सूर्यवंशी ३५७ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ३५१ धावांची नोंद करत विराट कोहलीनेही अव्वल चार स्पर्धकांमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात, कोहलीने केवळ १५ चेंडूंमध्ये २३* धावांची नाबाद खेळी साकारली.

पर्पल कॅपच्या शर्यतीत, भुवनेश्वर कुमार, अंशुल कंबोज आणि ईशान मलिंगा या प्रत्येकाने १४ विकेट्स मिळवले आहेत. मात्र, आपल्या उत्कृष्ट इकॉनॉमी रेटमुळे (धावा देण्याचे प्रमाण) भुवनेश्वर सध्या अव्वल स्थानावर आहे.

दरम्यान, जोफ्रा आर्चर, प्रिन्स यादव आणि कागिसो रबाडा या प्रत्येकाने १३ बळी मिळवले आहेत, ज्यामुळे पर्पल कॅपसाठीची स्पर्धा आणखीच तीव्र झाली आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या डावात खेळताना दिल्ली कॅपिटल्सला सर्व विकेट गमावून १6.३ षटकात केवळ ७५ धावा करता आल्या. माफक लक्ष्यचा पाठलागात आरसीबीने 6.3 षटकात 77 धावा करत सामना खिश्यात टाकला.

Comments are closed.