विराट कोहलीचा RCBला रामराम? नव्या कॉन्ट्रॅक्टवर साइन करण्यास दिला नकार; IPLपूर्वीच घेतला धक्काद


विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आयपीएल 2026: विराट कोहली आता आयपीएलमध्ये (Virat Kohli RCB News) आरसीबीसाठी खेळणार नाहीत का? त्याने आयपीएलमधून निवृत्ती घेतली का? की तो आता दुसऱ्या संघातून खेळताना दिसतील? असा प्रश्न सध्या सर्व चाहत्यांच्या मनात घर करून बसला आहे. सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्येही या विषयावर मोठी चर्चा सुरू आहे. पण या सगळ्यांमागचं खरं काय आहे? चला, जाणून घेऊया काय खरं आहे…

अलीकडे एका अहवालात असं सांगण्यात आलं की, विराट कोहली याने आरसीबीसोबतचा (Royal Challengers Bangalore) कमर्शिअल कॉन्ट्रॅक्ट साइन करण्यास नकार दिला आहे. आणि इथूनच त्याच्या आरसीबीमधून बाहेर पडण्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र प्रत्यक्षात तसं अजिबात नाही. विराट कोहली आरसीबीपासून वेगळा होत नाही. त्याने फक्त कमर्शिअल कॉन्ट्रॅक्ट साइन करण्यास नकार दिला आहे, याचा अर्थ असा अजिबात होत नाही की तो संघातून बाहेर पडत आहेत. विराट आयपीएल 2026 मध्येही आरसीबीकडूनच खेळताना दिसतील. त्याने आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.

विराट कोहलीने ज्या कमर्शिअल कॉन्ट्रॅक्ट साइन करण्यास नकार तो नक्की काय असतो? (What is a ‘commercial contract’?)

कमर्शिअल कॉन्ट्रॅक्ट आणि प्लेयर कॉन्ट्रॅक्ट या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. जर विराट आरसीबीमधून वेगळे व्हायचे ठरवले असते, तर त्याने प्लेयर कॉन्ट्रॅक्ट संपवला असता. पण त्याने फक्त कमर्शिअल कॉन्ट्रॅक्टवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे, म्हणजे तो काही ब्रँडच्या जाहिराती करणार नाही.

आयपीएलमधील प्रत्येक फ्रँचायझी अनेक स्पॉन्सर घेत असते. त्या स्पॉन्सरशिप करारात सांगितले जाते की, खेळाडू त्या ब्रँडसाठी जाहिरात, व्हिडिओ किंवा प्रमोशनल शूट करतील. त्यातून फ्रँचायझीला मोठा आर्थिक फायदा होतो. मात्र विराट सध्या कदाचित कोणत्याही विशिष्ट ब्रँडशी जोडले जाणं टाळत आहेत. म्हणूनच त्याने हा करार साइन न करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात, त्याने कोणत्या ब्रँडसोबतचा करार नाकारला, याबाबत मात्र कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

13 ते 15 डिसेंबरदरम्यान होऊ शकतो आयपीएल लिलाव (IPL 2026 auction likely around December 15)

आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी मिनी ऑक्शन होणार आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार, 13 ते 15 डिसेंबरदरम्यान कोणत्याही दिवशी हा लिलाव पार पडू शकतो. अद्याप बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने नेमकी तारीख निश्चित केलेली नाही, पण याच कालावधीत अधिकृत घोषणा होईल, अशी शक्यता आहे. तर आयपीएल संघांना त्यांच्या आवडीचे खेळाडू ठेवण्यासाठी म्हणजेच रिटेन करण्यासाठीची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. या दिवशी संध्याकाळपर्यंत सर्व दहा संघांनी आपल्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सादर करावी लागेल.

हे ही वाचा –

ICC Womens World Cup Points Table Update : बांगलादेशच्या पराभवामुळे टीम इंडियाचं वाट्टोळं, Point Table मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या वर्ल्डकपचं गणित?

आणखी वाचा

Comments are closed.