दिल्ली संघाची घोषणा! विराट कोहलीची निवड, पण खेळणार फक्त इतके सामने; ऋषभ पंतकडे संघाची धुरा, पाह
विजय हजारे ट्रॉफी दिल्ली संघ बातम्या : विजय हजारे ट्रॉफी 2025-26 हंगामाची सुरुवात 24 डिसेंबरपासून होत असून, दिल्लीच्या संघात विराट कोहली (Virat Kohli) खेळणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. अखेर दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेने (DDCA) यावर स्पष्टता दिली आहे. डीडीसीएने जाहीर केलं आहे की विराट कोहली हंगामातील सुरुवातीच्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. स्वतः कोहलीनेच आपल्या उपलब्धतेची अधिकृत माहिती संघटनेला दिली आहे.
कोहलीसोबत पंत आणि इशांतही दिल्लीच्या स्क्वाडमध्ये
विजय हजारे ट्रॉफीसाठी दिल्लीची स्क्वाड जाहीर करताना डीडीसीएने विराट कोहलीची उपस्थिती कन्फर्म केली असून, ऋषभ पंत आणि इशांत शर्मा हेही संघाचा भाग असतील, असं स्पष्ट केलं आहे. या स्पर्धेसाठी ऋषभ पंतकडे दिल्लीच्या संघाची कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर आयुष बडोनीची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय नितीश राणा स्क्वाडमध्ये असून, वेगवान गोलंदाज हर्षित राणा उपलब्ध असल्यास दिल्लीकडून खेळताना दिसतील. डीडीसीएने सध्या फक्त पहिल्या दोन सामन्यांसाठीच स्क्वाड जाहीर केली आहे.
दिल्लीचा पहिला सामना आंध्र प्रदेशविरुद्ध
आगामी विजय हजारे ट्रॉफीत दिल्लीचा पहिला सामना 24 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 26 डिसेंबरला गुजरातविरुद्ध दुसरा सामना खेळला जाईल. या दोन्ही सामन्यांत विराट कोहली प्लेइंग इलेव्हनमध्ये असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील, कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याच्या बॅटमधून जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली होती.
क्रिकेटपटू ऋषभ पंत, विराट कोहली, इशांत शर्मा आणि नवदीप सैनी यांनी त्यांच्या उपलब्धतेची पुष्टी केली आहे आणि 2025-26 देशांतर्गत हंगामातील विजय हजारे ट्रॉफीसाठी ते दिल्ली वरिष्ठ पुरुष संघाचा भाग असतील. ऋषभ पंतची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हर्षित राणा… pic.twitter.com/uO75BB70x2
— ANI (@ANI) १९ डिसेंबर २०२५
विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी दिल्लीचा संघ (Vijay Hazare Trophy Delhi Squad) –
ऋषभा पंत (कर्णधार), आयुषा बडोनी (करुणा), विराट कोहली, अर्पित राणा, यश धुल, सार्थक रंजन, तेजस्वी सिंग (यशतिया टेक्नॉलॉजी, हरीशा, हरीश राणा, हरीश राणा, हरीश राणा, हरिश राणा, हरीश राणा, हईसा नवनवीन शर्मा, सैनिक नवनवीन शर्मा) गार्ड).
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.