बीसीसीआयने विराटच्या थाटाला साजेसा निरोप दिला नाही, आता आरसीबीचे फॅन्स पांढरा सलाम देणार, खास प
विराट कोहली आरसीबी वि केकेआर आयपीएल 2025: भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) याने 12 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. अलिकडेच रोहित शर्माने (Rohit Sharma) कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले. रोहितच्या निवृत्तीच्या पाच दिवसांनंतर, विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. विराट कोहलीने घेतलेल्या अचनाक निर्णयानंतर सर्व भारतीयांना धक्का बसला. आता एक नवीन माहिती समोर येत आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या तणावामुळे आयपीएलची स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित सामने 17 मे पासून खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या उर्वरित सामन्यासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स (Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा सामना बंगळुरुमधील चिन्नस्वामी मैदानात खेळवण्यात येईल. या सामन्यासाठी विराट कोहलीसाठी आरसीबीचे चाहते एक खास प्लॅन तयार करत असल्याचं समोर येत आहे.
चाहते विराट कोहलीला ठोकणार सलाम-
बंगळुरु आणि कोलकाताच्या या सामन्यात बंगळुरुच्या मैदानात सामन्याचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक चाहत्याने पांढऱ्या रंगातील कपडे घालून मैदानावर यावे, अशी विनंती करण्यात येत आहे. याचा अर्थ कसोटी क्रिकेटमधील विराट कोहलीच्या बहुमूल्य योगदानासाठी चाहते व्हाइट आउटफिट्समध्ये किंग कोहलीला खास अंदाजात सलाम करताना दिसतील. आरसीबीच्या मॅचवेळी बंगळुरुच्या मैदानात लाल रंगाची हवा दिसते. पण यावेळी चाहते पांढेर रंगाचे कपडे घालत विराट कोहलीला सलाम ठोकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
आरसीबी चाहत्यांनी विराट कोहलीला एक उत्तम श्रद्धांजली वाहिण्यासाठी चाचणी व्हाईट जर्सी घालण्याची विनंती केली. 👏❤
– चाहत्यांनी आश्चर्यकारक उपक्रम! pic.twitter.com/phcg0zfgmq
– मुफद्दाल वोहरा (@mufaddal_vohra) मे 13, 2025
विराट कोहलीची कसोटी कारकीर्द-
विराट कोहलीने जून 2011 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने वेस्ट इंडिजच्या संघाविरुद्ध पहिला सामना खेळला होता. विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकीर्दीत एकूण 123 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये 210 डावांमध्ये विराट कोहलीने 46.85 च्या सरासरीने 9230 धावा केल्या आहेत. यामध्ये 30 शतकं आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा एक यशस्वी कर्णधार होता आणि त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू ग्रेग चॅपलनंतर कसोटी कर्णधारपदाच्या पदार्पणात दुहेरी शतके करणारा विराट कोहली एकमेव दुसरा क्रिकेटपटू आहे.
https://www.youtube.com/watch?v=_v2mhwdk0ts
संबंधित बातमी:
अधिक पाहा..
Comments are closed.