“हा केवळ विजय नव्हे, भारतीय क्रिकेटचा भक्कम पाया…”, विजयानंतर विराटची भावनिक प्रतिक्रिया
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट कोहलीने स्पष्ट शब्दांत सांगितले की त्याचे उद्दिष्ट फक्त आयसीसी ट्रॉफी जिंकणे नाही, तर भारतीय क्रिकेटचा उज्ज्वल भविष्याकडे प्रवास सुकर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवत विजेतेपद पटकावले. यानंतर कोहली म्हणाला, “जेव्हा तुम्ही संघाचा निरोप घेता, तेव्हा तो चांगल्या स्थितीत सोडणे महत्त्वाचे असते. आमच्याकडे असा संघ आहे, जो पुढील आठ वर्षे कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास सक्षम आहे.” (Virat kohli on his Retirement)
यंदाच्या चॅम्पियन्स ट्राॅफीच्या अंतिम सामन्यात कोहली अवघ्या एका धावेवर बाद झाला असला, तरी पाकिस्तानविरुद्धच्या त्याच्या शानदार शतकाने आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यातील अर्धशतकाने भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. “हे एक अद्भुत क्षण आहेत,” असे तो जिओ हॉटस्टारला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. “ऑस्ट्रेलियाच्या कठीण दौऱ्यानंतर आम्ही पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील होतो आणि अखेर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले.” (Viart kohli on team india winning champions trophy 2025)
शुबमन गिलसोबत उभे राहून कोहलीने सांगितले की, एक वरिष्ठ खेळाडू म्हणून त्याचे मुख्य लक्ष पुढील पिढीला घडवण्यावर आहे. “आमच्या ड्रेसिंग रूममध्ये अफाट प्रतिभा आहे आणि हे खेळाडू आपला खेळ पुढच्या स्तरावर नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. वरिष्ठ खेळाडू म्हणून आम्हाला त्यांना मार्गदर्शन करणे आणि अनुभव शेअर करणे महत्त्वाचे वाटते. याच मानसिकतेमुळे भारतीय संघ अधिक बळकट झाला आहे.” (Virat kohli on team india future)
विजयाच्या श्रेयाविषयी बोलताना कोहली म्हणाला, “ही संपूर्ण संघाची मेहनत आहे. आम्ही सराव सत्रांमध्ये प्रचंड मेहनत घेतली आणि त्याचे हे फळ आहे. शुभमन, श्रेयस, केएल, हार्दिक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रत्येक खेळाडूने दिलेल्या योगदानामुळेच आम्ही आज येथे पोहोचलो आहोत.”
हेही वाचा-
रोहितचा शिव्या देतानाचा व्हिडीओ व्हायरल? पहा काय म्हणतोय व्हिडीओमध्ये????
रिटायर होणार? पहा समोर येत रोहितने काय दिले उत्तर!
पाकिस्तानचा एकही व्यक्ती ट्रॅाफी द्यायला का नव्हता? पहा कुणी केलीय तक्रार
Comments are closed.