गेल, राहुल, चहल IN, सिराज OUT…; कोहलीने निवडली RCB ची ऑलटाइम धडकी भरवणारी Playing XI
विराट कोहली आरसीबी ऑल टाइम प्लेइंग इलेव्हन : आयपीएलच्या (IPL 2026) हंगामाला सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) आमनेसामने येणार आहेत. गेल्या हंगामात आरसीबीने आयपीएल 2025 चे विजेतेपद पटकावले होते, त्यामुळे यंदाच्या हंगामाची सुरुवातही ते विजयाने करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत. दरम्यान, आरसीबीच्या सोशल मीडियावर विराट कोहलीचा (Virat Kohli) एक खास इंटरव्ह्यू समोर आला आहे. या मुलाखतीत कोहलीने आरसीबीची ऑल-टाइम प्लेइंग 11 निवडली. त्याने संघात अनेक दिग्गज खेळाडूंना स्थान दिले, पण चाहत्यांना आश्चर्य वाटेल अशी बाब म्हणजे मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यांना याने संघातून बाहेर ठेवले.
विराट कोहलीची RCB ची ऑलटाइम प्लेइंग 11 – (Virat Kohli RCB All-Time Playing XI)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अधिकृत X (ट्विटर) अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली स्वतःची आवडती आरसीबी ऑल-टाइम प्लेइंग इलेव्हन निवडताना दिसतो. सुरुवातीला सलामीवीर म्हणून कोहलीने ख्रिस गेल आणि स्वतःची निवड केली, तर तिसऱ्या क्रमांकासाठी एबी डी डिव्हिलियर्सला स्थान दिलं.
यानंतर संघाची गोलंदाजी भक्कम करण्यासाठी कोहलीने दोन परदेशी वेगवान गोलंदाजांची निवड केली. त्यांनी घातक वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि डेल स्टेन यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं. तर मधल्या फळीत कोहलीने चौथ्या क्रमांकासाठी केएल राहुल, पाचव्या क्रमांकासाठी रजत पाटीदार आणि सहाव्या क्रमांकासाठी दिनेश कार्तिकची निवड केली. गोलंदाजी विभाग पूर्ण करण्यासाठी कोहलीने फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलला संघात घेतलं. त्यानंतर भारताचे दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळे आणि वेगवान गोलंदाज हर्षल पटेल यांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केलं.
मोहम्मद सिराज विराटच्या प्लेइंग 11 मधून OUT
मात्र, या सगळ्या निवडीदरम्यान एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. कोहलीच्या कर्णधारपदाखाली बराच काळ आरसीबीसाठी खेळलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याचं नाव संघात नव्हतं. सिराजने 2018 ते 2024 या काळात RCB साठी 87 सामन्यांत 83 विकेट्स घेतल्या आहेत आणि तो फ्रँचायझीसाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
विराट कोहलीची ऑलटाइम RCB प्लेइंग 11
ख्रिस गेल, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, केएल राहुल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, हर्षल पटेल, अनिल कुंबळे, मिचेल स्टार्क, डेल स्टेन, युझवेंद्र चहल.
टॉप-ऑर्डर 💀💀💀
मधली फळी 👊👊👊👊
वेगवान आक्रमण ❤️🔥❤️🔥
फिरकी-जुळे 🌪🌪किंग कोहलीच्या सर्वकालीन RCB XI 👀 मध्ये कोण मोडते ते शोधा
हे आहे @bigbasket_com आरसीबी बोल्ड डायरी सादर करते. 📹
PS: हा व्हिडिओ आयपीएल 2025 हंगामाच्या सुरुवातीला रेकॉर्ड करण्यात आला होता. #PlayBold #OurRCB pic.twitter.com/6uVeCFjegR
— रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (@RCBTweets) १६ मार्च २०२६
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संपूर्ण संघ- (IPL 2026 RCB Full Squad)
रजत पाटीदार (कर्ंधर), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जेकब बेथेल, जोश हेझलवूड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसीक शर्मा, अब्दुल शर्मा, अब्दुल शर्मा, अब्दुल सिंह, अब्दुल कुमार, यश दयाल. डफी, सात्विक देसवाल, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विकी ओस्तवाल विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.