विराटला कसा वाटला ‘धुरंधर 2’? किंग कोहलीनं दिला रिव्यू, रणवीर सिंहच्या अभिनयावर थेटच म्हणाला…

विराट कोहलीने रणवीर सिंग धुरंधर 2 चे पुनरावलोकन केले: बॉलिवूड अभिनेता (Bollywood ) रणवीर सिंह स्टार ‘धुरंधर: द रिव्हेंज’ (Dhurandhar: The Revenge) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. सिनेमानं रिलीज झाल्यापासूनच बॉक्स ऑफिसवर (Dhurandhar 2 BO Collection) कित्येक दिग्गजांना लोळवलंय. अनेकांच्या रेकॉर्ड्सचा चक्काचूरही केलाय. या सिनेमाचा पहिला भागही प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेला. तर, दुसरा पार्ट तर सुपरडुपर हिट ठरतोय. रिलीज होऊन 19 दिवस लोटले तरीसुद्धा ‘धुरंधर 2’ची यशस्वी घौडदौड सुरूच आहे. क्रिकेट जगतातही ‘धुरंधर 2’ची क्रेझ पाहायला मिळालीय. अशातच आता टीम इंडियाची रम मशीन दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीसुद्धा स्वतःला ‘धुरंधर 2’ (Dhurandhar 2) पाहण्यापासून रोखू शकला नाही. बरं विराटनं ‘धुरंधर 2’ पाहिलाच नाहीतर, त्यानं आपला रिव्यूसुद्धा केलाय. तर, रणवीर सिंहच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलंय.

सोमवारी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bengaluru) माजी कर्णधार असलेल्या विराट कोहलीनं (Virat Kohli) आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘धुरंधर 2’चा रिव्यू पोस्ट केलाय. त्यात त्यानं लिहिलंय की, सिनेमाच्या संपूर्ण चार तासांच्या कालावधीत त्याला स्क्रीनवरून एका क्षणासाठीही आपली नजर हटवता आली नाही. कोहलीनं लिहिलंय की, “मी आज ‘धुरंधर 2’ सिनेमा पाहिला आणि मी पूर्ण आत्मविश्वासानं असं म्हणू शकतो की, भारतात मला यापूर्वी कधीही असा सिनेमा पाहण्याचा अनुभव आला नव्हता. या सिनेमानं माझ्या मनात सर्व प्रकारच्या भावना जागृत केल्या आणि जवळपास चार तास, मी माझ्या जागेवरून एका क्षणासाठीही हललो नाही…”

दिग्दर्शक आदित्य धरवरही विराट कोहलीनं स्तुतिसुमनं उधळली आहेत. विराटनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलंय की, “तुम्ही निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीतून तुमची प्रतिभा आणि समर्पण स्पष्टपणे दिसतंय. तुम्हाला माझा सलाम! तुम्ही खरोखरंच एक अद्भूत आहात…” दरम्यान, अभिनेता रणवीर सिंहबद्दल बोलताना कोहली म्हणाला की, “रणवीर सिंह, या सिनेमानंतर तुम्ही एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहात. तुमचा अभिनय केवळ अप्रतिमच नव्हे, तर त्याहूनही कितीतरी श्रेष्ठ होता… खरोखरंच, हा एक अविश्वसनीय अनुभव होता…”

'धुरंधर 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन

प्रदर्शित झाल्यापासून, ‘धुरंधर 2’ सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडीत काढलेत. सिनेमाच्या कमाईत दिवसेंदिवस वेगानं वाढ होतेय. मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाच्या एकूण कमाईनं (कलेक्शनने) 1 हजार कोटींचा टप्पा ओलांडलाय. अवघ्या दोन आठवड्यांच्या कालावधीतच, सिनेमाची भारतातील एकूण बॉक्स ऑफिस कमाई 1,134 कोटींवर पोहोचलीय, तर जगभरातील त्याची एकूण कमाई आता 1,501 कोटींवर स्थिरावली आहे. चित्रपटानं नवव्या दिवशी 42 कोटी, दहाव्या दिवशी 64 कोटी, अकराव्या दिवशी 71 कोटी, बाराव्या दिवशी 26 कोटी, तेराव्या दिवशी 28 कोटी, चौदाव्या दिवशी 21 कोटी आणि पंधराव्या दिवशी 19 कोटींची कमाई केलीय.

टीम इंडियाची रन मशीन विराट कोहलीबाबत बोलायचं झाल्यास, तो सध्या आयपीएल 2026 खेळताना दिसतोय. त्यानं आयपीएलच्या दोन सामन्यांमध्ये एकूण 97 धावा केल्यात. त्याचा स्ट्राईक रेट 173 इतका आहे. कोहलीचा संघ, म्हणजेच ‘आरसीबी’ (RCB), सध्या पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंतचे दोन्ही सामने जिंकलेत आणि संघाचा पुढला सामना 10 एप्रिल रोजी ‘राजस्थान रॉयल्स’ विरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

आणखी वाचा

Comments are closed.