“जेव्हा तुम्ही हार मानण्याचा निर्णय घेता तेव्हाच…”, ऑस्ट्रेलियात लँड होताच विराट कोहलीची सूचक पोस्ट

टीम इंडियाचा ‘रनमशीन’ विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर विराट पहिल्यांदा मैदानात उतरणार आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला विराट ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे मालिकेत खेळताना दिसणार आहे. 19 ऑक्टोबर दरम्यान या मालिकेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी विराट कोहली याने केलेली एक क्रिप्टिक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
जेव्हा तुम्ही हार मानण्याचा निर्णय घेता तेव्हाच तुम्ही खरोखरच अपयशी ठरता.
— विराट कोहली (@imVkohli) 16 ऑक्टोबर 2025
Comments are closed.