मला कसोटी क्रिकेटमधून निवृत्त व्हायचंय! रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीने फोडला बॉम्ब, फॅन्सला धक्का

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटला रामराम गेला. मंगळवारी सोशल मीडियावर एक पोस्ट करा रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचा जाहीर केले. ऐन इंग्लंड दौऱ्याच्या तोंडावर रोहितने घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला. या धक्क्यातून सावरत नाही तोच रनमशीन विराट कोहली हा देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे. मला कसोटी क्रिकेट मधून निवृत्त व्हायचे आहे, असा निरोप त्याने भारतीय क्रिकेट नियमक मंडळ अर्थात बीसीसीआयला कळवला आहे. मात्र बीसीसीआयच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी त्याला या निर्णयाचा पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ने याबाबत वृत्त दिले आहे.
Comments are closed.