आलिशान बंगला, आकर्षक फ्लॅट; ऑस्ट्रेलियाला निघाण्याआधी कोहलीने भावाच्या नावावर केली प्रॉपर्टी, न
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट कोहली: विराट कोहली (Virat Kohli) सध्या भारतीय क्रिकेट संघासोबत पर्थमध्ये आहे, जिथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार आहे. मार्चमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर कोहलीचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असेल. 2025 मधील आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर विराट कोहली लंडनला रवाना झाला होता. त्यानंतर विराट कोहली थेट 14 ऑक्टोबर रोजी दिल्लीत परतला आणि 15 ऑक्टोबरला टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाला. पण यादरम्यान विराट कोहलीने एक महत्वाचे काम केले. विराट कोहलीने गुरुग्रामची मालमत्ता जीपीए (जनरल पॉवर ऑफ अॅटर्नी) द्वारे त्याचा भाऊ विकास कोहलीला (Virat Kohli Transfer Gurugram Property) हस्तांतरित केली.
विराट कोहली पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि दोन मुलांसह लंडनमध्ये राहतो. भारताचे सामने असल्यावर विराट कोहली भारतात येतो. सध्या लंडनमध्ये जास्त वेळ घालवत असल्यामुळे विराट कोहलीने त्याचा मोठा भाऊ विकास कोहलीला जनरल पॉवर ऑफ अॅटर्नी दिला आहे. जेणेकरून त्याला त्याच्या मालमत्तेशी संबंधित कोणतेही सरकारी काम किंवा कायदेशीर निर्णय घ्यावे लागू नयेत. विराट कोहलीने यावेळी गुरुग्राम तहसील कार्यालयात जाऊन अनेक कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. दरम्यान, गुरुग्राममधील डीएलएफ सिटी फेज-1 मध्ये विराट कोहलीचा एक आलिशान बंगला आहे. गुरुग्राममध्ये विराट कोहलीच्या नावावर एक आलिशान फ्लॅट देखील आहे. विराट कोहली मालमत्तेचा मालक असला तरी, मालमत्तेचे कायदेशीर अधिकार आता विकास कोहलीकडे आहेत.
(विराट कोहलीने गुरुग्रामची संपत्ती भाऊ विकास कोहलीला हस्तांतरित केली)
ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी विराट कोहली मंगळवारी गुरुग्रामच्या तहसील कार्यालयात जमिनीसंबंधीच्या कामाचा निपटारा करण्यासाठी पोहोचला होता, अधिकाऱ्यांनी काही मिनिटांत केली कामे!#विराटकोहली #गुरुग्राम #क्रिकेट न्यूज #ABPNews pic.twitter.com/Tq6IPW4Y38
— एबीपी न्यूज (@ABPNews) १५ ऑक्टोबर २०२५
विराट कोहलीची एकूण संपत्ती किती?
विराट कोहलीची अंदाजित एकूण संपत्ती सुमारे ₹1050 कोटी ($125 दशलक्ष) आहे, जी क्रिकेट, ब्रँड एंडोर्समेंट आणि व्यवसायातून मिळवली आहे. तो भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि मौल्यवान सेलिब्रिटींपैकी एक आहे, ज्याची ब्रँड व्हॅल्यू $231.1 दशलक्ष आहे. त्याच्या उत्पन्नाचा मोठा भाग ब्रँड एंडोर्समेंटमधून येतो, जिथे तो प्रति करार ₹7 ते ₹10 कोटी घेतो. MPL, Pepsi, Philips, Fasttrack, Boost, Audi, MRF, Hero, Puma यांसारख्या ब्रँड्सच्या जाहिरातींमधून विराट कोहलीने भरपूर पैसा कमावला आहे. Chisel Fitness, Nueva, Sport Convo आणि Digit या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.