IND vs SA: विराट कोहलीचा 9 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर अभिषेक शर्मा! रचणार नवा इतिहास

भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मासाठी (Abhishek Sharma) दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे पहिले दोन सामने फारसे चांगले गेले नाहीत. कटक आणि न्यू चंडीगढ येथे तो अनुक्रमे 17-17 धावा करून बाद झाला. आज तिसरा टी-20 सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे आणि या सामन्यात तो संघासाठी विजयी खेळी करू इच्छितो. विशेष म्हणजे, अभिषेक शर्मा विराट कोहलीच्या (Virat Kohli) एका मोठ्या विक्रमाला मोडण्याच्या जवळ पोहोचला आहे.

अभिषेक शर्मासाठी 2025 हे वर्ष खूपच चांगले राहिले. तो टी-20 क्रमवारीत जगातील नंबर-1 फलंदाज बनला आहे. यावर्षी त्याने खेळलेल्या 38 टी-20 डावांमध्ये 1533 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 200 पेक्षा जास्त राहिला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे आणखी 3 टी-20 सामने तो खेळणार आहे. या तीन सामन्यांत त्याने 82 धावा केल्यास तो विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडू शकतो. 2025 मध्ये अभिषेक शर्माने 2022 मध्ये भारतीय संघासाठी 790 धावा केल्या आहेत. तसेच, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) 2025-26 मध्ये त्याने 50.66 च्या सरासरीने 304 धावा केल्या. SMAT मध्ये त्याचा स्ट्राइक रेट 249.18 इतका जबरदस्त होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात त्याने 17-17 धावा केल्या, पण कोहलीचा विक्रम मोडण्यासाठी त्याला आजच्या सामन्यासह आणखी 3 सामने उपलब्ध आहेत.

अभिषेकने कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी-20 धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) विक्रम मोडला असून तो आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. आता त्याचे लक्ष कोहलीच्या विक्रमावर आहे.

कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी-20 धावा (भारतीय फलंदाज)
1614 विराट कोहली 2016
1533* अभिषेक शर्मा 2015
1503 सूर्यकुमार यादव 2022

अभिषेक शर्मा (1533 धावा) आता सूर्यकुमार यादवला (2022 मध्ये 1503 धावा) मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीचा विक्रम मोडण्यासाठी त्याला या वर्षी अजून 82 धावांची गरज आहे. आजच्या धर्मशाला येथील सामन्यासह त्याच्याकडे अजून 3 संधी आहेत.

Comments are closed.