IPL 2026: आयपीएल पूर्वी विराट कोहलीचा धमाका; सराव सामन्यात 200 च्या स्ट्राईक रेटने केल्या इतक्या धावा!

आयपीएलच्या (IPL 2026) नवीन हंगामाची सुरुवात 28 मार्चपासून होत आहे. रजत पाटीदारच्या (Rajat Patidar under captaincy) नेतृत्वाखाली आरसीबीचा संघ आपले जेतेपद (Title) राखण्यासाठी मैदानात उतरेल. या स्पर्धेपूर्वी संघासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे विराट कोहलीचा (Virat Kohli’s Form) फॉर्म. विराटने आरसीबीच्या सराव सामन्यात वादळी फलंदाजी करून गोलंदाजांना धोक्याचा इशारा दिला आहे. त्याने केवळ 19 चेंडूंत 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 45 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत आपले आक्रमक रूप दाखवले.

आयपीएल 2026 मध्ये जर आरसीबीला पुन्हा विजेतेपद मिळवायचे असेल, तर विराट कोहलीला फलंदाजीने कमाल करावी लागेल. या हंगामात तो पुन्हा एकदा फिल सॉल्टसोबत (Phil salt) सलामीला (Opening) येताना दिसेल. गेल्या 3 हंगामांपासून विराट सातत्याने 600 पेक्षा जास्त धावा करत आहे. मागील हंगामात त्याने 8 अर्धशतकेही झळकावली होती. आयपीएलच्या इतिहासात तो फक्त आरसीबीकडूनच खेळला असून, आतापर्यंत त्याने 268 सामन्यांत 39.54 च्या सरासरीने 8661 धावा केल्या आहेत.

37 वर्षांच्या विराट कोहलीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. यावेळेस आयपीएलमध्ये अनेक मोठे विक्रम करण्यावर त्याचे लक्ष असेल. तो या स्पर्धेत 9 हजार धावा पूर्ण करण्याच्या खूप जवळ आहे. आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला हा टप्पा गाठता आलेला नाही. तसेच, आयपीएलमध्ये 8 शतके ठोकण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. आरसीबीचा संघ 28 मार्च रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर (Chinnaswamy Stadium या हंगामातील पहिला सामना खेळेल. हा सामना जिंकून विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात करण्याचा संघाचा मानस आहे.

Comments are closed.