ओव्हलमध्ये टीम इंडियाचा थरारक विजय! विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया, सिराजच्या कामगिरीचं केलं कौतुक
भारतीय संघाने (Team india) अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवत ओव्हलमध्ये विजयाचा झेंडा फडकावला. थराराने भरलेल्या या सामन्यात शुबमन गिलच्या (Shubman gill) युवा ब्रिगेडने इंग्लंडला 6 धावांनी पराभूत केलं. या विजयाचा हिरो डीएसपी मोहम्मद सिराज (Mohmmed Siraj) ठरला, ज्याने शेवटच्या दिवशी तीन महत्वाचे विकेट्स घेत इंग्लंडचा अख्खा डाव उध्वस्त केला.
टीम इंडियाच्या जबरदस्त कामगिरीवर विराट कोहलीचाही (Virat Kohli) प्रतिक्रिया समोर आली आहे. किंग कोहलीने संघाच्या धडाकेबाज कामगिरीचं जोरदार कौतुक केलं आहे. विशेषतः मियाँ भाईच्या म्हणजेच सिराजच्या योगदानाचा त्याने आवर्जून उल्लेख केला.
ओव्हल टेस्टमध्ये टीम इंडियाला मिळालेल्या या अविस्मरणीय विजयावर विराट कोहलीनेही गिलच्या युवा ब्रिगेडचं कौतुक करत त्यांच्या पाठीवर थाप मारली आहे. त्याने ट्वीट करत लिहिलं, टीम इंडियाचा (Team india) अप्रतिम विजय! प्रसिद्ध आणि सिराजने कमाल चिकाटी आणि जिद्द दाखवली, ज्याच्या जोरावर हा अद्भुत विजय मिळवता आला. सिराजचा खास उल्लेख करतो कारण तो संघासाठी स्वतःला झोकून देतो. त्याच्या या कामगिरीसाठी मला खूप आनंद होतो आहे.
Comments are closed.