विराट कोहली की सचिन तेंडुलकर? एबी डिविलियर्सने सांगितलं, कोण आहे सर्वकालीन महान फलंदाज
दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार एबी डिविलियर्स (Ab devilliers) आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांची मैत्री सर्वांनाच माहित आहे. दोघांनीही आयपीएलमध्ये आरसीबी (RCB) संघासाठी बराच काळ एकत्र खेळ केला आहे. मात्र नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये जेव्हा शुभंकर मिश्रा यांनी एबी डिविलियर्सला एक हटके आणि गुंतागुंतीचा प्रश्न विचारला, तेव्हा तो थोडा गोंधळला.
या यूट्यूब मुलाखतीदरम्यान, मिश्रा यांनी एबीला विचारलं की ग्रेट सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि ग्रेट विराट कोहली (Virat Kohli) यामधून कोणाला निवडशील? त्यावेळी डिविलियर्स कोहलीच्या बाजूने थोडा झुकलेला दिसला.
रॅपिड-फायर राउंडमध्ये डिविलियर्स म्हणाला, तुलना कशी करता येईल? वेगवेगळ्या पिढ्यांची तुलना करणं अशक्य आहे. दोघंही त्यांच्या काळात सर्वोत्तम होते.
उत्तर देताना डिविलियर्स म्हणाला की, तो जेव्हा लहान होता, तेव्हा तेंडुलकर हा त्याचा आदर्श होते. मात्र त्याने हेही स्पष्ट केलं की, विराट कोहली सर्व फॉरमॅटमध्ये महान खेळाडू ठरले आहे, तर सचिन तेंडुलकर हे मुख्यत कसोटी क्रिकेटचा बादशाह होता.
डिविलियर्स पुढे म्हणाला, सचिनबद्दल मला खूप आदर आहे. ते फारच नम्र आणि साधे आहेत. मी त्यांना मनापासून सन्मान देतो. विराट माझा खूप जवळचा मित्र आहे, म्हणून निवडणं कठीण आहे. पण मला वाटतं विराट सर्व फॉर्मेटमध्ये महान आहे आणि सचिन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च होते.
त्याच संभाषणात डिविलियर्सला विचारण्यात आलं की, तुझ्या मते आतापर्यंतचा सर्वात अवघड गोलंदाज कोण? यावर त्याने कोणाचंही नाव न घेता थेट भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं (Jasprit Bumrah) नाव घेतलं. डिविलियर्स म्हणाला, बुमराह हा त्या महान गोलंदाजांपैकी एक आहे, ज्याच्याविरुद्ध मी कधीही खेळलो आहे.
Comments are closed.