विराट-रोहितच्या पुनरागमनाला उशीर! इंडिया A साठी खेळणे कठीण? BCCI अधिकाऱ्याचा खुलासा समोर
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की कोहली आणि रोहित इंडिया ए संघासाठी खेळू शकतात. कानपूरमध्ये ऑस्ट्रेलिया ए आणि इंडिया ए यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. त्यातील पहिला सामना 30 सप्टेंबरला खेळवला जाईल. यात रोहित-विराट खेळतील अशी अपेक्षा होती, पण आता बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की त्यांचा खेळणे कठीण आहे.
TOI शी बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की विराट-रोहित यांच्या इंडिया ए साठी खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यांच्याबाबत बीसीसीआयने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. बीसीसीआय अधिकाऱ्याने म्हटले, “दोघेही इंडिया ए साठी तीन सामने खेळतील याची शक्यता कमी आहे. याबाबत अद्याप काही ठरलेले नाही, पण त्यांना जबरदस्तीने खेळवले जाणार नाही. जर त्यांना थोडा गेम टाइम हवा असेल, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी तुम्ही त्यांना एक-दोन सामने खेळताना पाहू शकता. मात्र सध्या काहीही निश्चित झालेले नाही. दोघेही फिट आहेत आणि ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेसाठी उपलब्ध आहेत.”
विराट कोहली आणि रोहित शर्मा जर इंडिया ए साठी खेळले नाहीत, तर त्यांचे पुनरागमन ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत होऊ शकते. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. यात विराट आणि रोहित यांचे खेळणे निश्चित आहे. दोघांनी अलीकडेच फिटनेस चाचणीही उत्तीर्ण केली आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनीही स्पष्ट केले आहे की ऑस्ट्रेलियात ते खेळताना दिसतील.
Comments are closed.