IND vs NZ: किंग कोहलीलाही टाकलं मागे; अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्ध मोडला ऐतिहासिक विक्रम!

क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे! भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेचा दणक्यात श्रीगणेश झाला आहे. पहिल्याच सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. त्याने डावाची सुरुवात करताना 35 चेंडूंत 240.00 च्या स्ट्राईक रेटने 84 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 8 षटकार लगावले.

अभिषेक शर्माने एक खास टप्पा ओलांडला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात वेगवान 5000 धावा पूर्ण करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता, ज्याने 167 डावांत 5000 धावा केल्या होत्या. मात्र, अभिषेकने अवघ्या 165 डावांतच हा आकडा गाठून विराटला मागे टाकले आहे.

भारताकडून सर्वात वेगवान 5000 टी-20 धावा करण्याचा विक्रम के.एल. राहुलच्या (KL Rahul) नावावर आहे (143 डाव), तर शुबमन गिल (154 डाव) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

भारताकडून सर्वात वेगवान 5000 टी-20 धावा करणारे टॉप 4 फलंदाज:

के.एल. राहुल 143
शुभमन गिल 154
अभिषेक शर्मा 165
विराट कोहली 167

जागतिक टी-20 क्रिकेटचा विचार केला तर सर्वात वेगवान 5000 धावांचा विक्रम ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने अवघ्या 132 डावांत ही कामगिरी केली होती. त्यानंतर के.एल. राहुल (143 डाव) आणि शॉन मार्श (144 डाव) यांचा क्रमांक लागतो.

Comments are closed.