IND vs AUS: विराट कोहलीसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या खेळाडूची ऑस्ट्रेलिया संघात एन्ट्री! जाणून घ्या सविस्तर
पर्थमध्ये झालेल्या विजयासह ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या वनडेमध्ये कंगारू संघाचे प्रदर्शन जबरदस्त होते. त्यांच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला फक्त 136 धावांवर रोखले, तर फलंदाजांनी दमदार खेळ करत सहज विजय मिळवला.
आता दुसऱ्या वनडेपूर्वी ऑस्ट्रेलियाची ताकद आणखी वाढणार आहे, कारण संघात दोन स्टार खेळाडूंचे पुनरागमन होत आहे. अॅडम जम्पा (Addam zampa & Alex carry) आणि अॅलेक्स केरी हे दोघेही एडिलेडमध्ये होणाऱ्या सामन्यासाठी संघात सामील झाले आहेत.
जम्पाचा विराट कोहलीविरुद्धचा विक्रम उत्कृष्ट आहे. त्याने कोहलीला वनडे फॉरमॅटमध्ये तब्बल 5 वेळा बाद केले आहे. त्याचवेळी केरीनेही मागील काही काळात ऑस्ट्रेलियासाठी चांगली कामगिरी केली आहे. जम्पाला जागा देण्यासाठी मॅथ्यू कुहनेमनला बाहेर बसावे लागू शकते.
पहिल्या वनडेमध्ये जोश हेजलवूडने (Josh hazelwood) शानदार गोलंदाजी करत फक्त 20 धावांत 2 विकेट घेतल्या होत्या, तर मायकेल ओवेननेही 2 गडी बाद केले होते.
Comments are closed.