IPL 2026: त्याला पुन्हा कसोटी कर्णधार करा..' आयपीएल 2026 मधील कोहलीचा 'विराट' अवतार पाहून या खेळाडूने केली मोठी मागणी
आयपीएल 2026 स्पर्धेचा (Indian premiere league) पहिला सामना शनिवारी (28 मार्च) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात रंगला. या सामन्यात आरसीबीने विराट कोहलीच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर 200 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य आरामात गाठत एकतर्फी विजय मिळवला.
धावांचा पाठलाग करताना विराटने अवघ्या 38 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 69 धावा केल्या. त्याची ही खेळी पाहून भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू (Ambati Rayudu) भलताच प्रभावित झाला आहे. रायडूने मागणी केली आहे की, कोहलीने पुन्हा एकदा भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवावे.
ईएसपीएनशी बोलताना रायडू म्हणाला, मला अजिबात वाटत नाही की विराट त्याच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्याच्यात अजून किमान 5-6 वर्षांचे क्रिकेट शिल्लक आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून पुनरागमन करायला हवे. गेल्या काही वर्षांत मी पाहिलेला तो रेड बॉल क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधार आहे. सध्या तो ज्या फॉर्ममध्ये आहे, त्या स्थितीत तो कर्णधार नसणे हे भारतीय क्रिकेटचे नुकसान आहे.
हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 201 धावा केल्या. कर्णधार ईशान किशनने सर्वाधिक 80 धावा (38 चेंडू) केल्या, तर अनिकेत वर्माने 18 चेंडूत 43 धावांची खेळी केली. तसेच बेंगळुरूने प्रत्युत्तरात हे लक्ष्य केवळ 15.4 षटकांत 4 बाद 203 धावा करून पूर्ण केले. यामध्ये विराट कोहली 69*, देवदत्त पडिक्कल 61 आणि कर्णधार रजत पाटीदारने 31 धावा केल्या.
Comments are closed.