“ऑस्ट्रेलियाला वाटत होतं, आणखी एक सेमीफायनल आरामात…”, हिंदुस्थानच्या पोरी फायनलमध्ये पोहोचताच सेहवागचा सिक्सर!

संधीचे सोनं करत हिंदुस्थानच्या महिला खेळाडूंनी सात वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमधून घरचा रस्ता दाखवला आणि तिसऱ्यांदा फायनलमध्ये धडक दिली. जेमिमा रॉड्रिग्ज हिने नाबाद 127 धावांची अविस्मरणीय खेळी केली. यामुळे तिचे आणि हिंदुस्थानच्या पोरींचे कौतुक होत आहे. सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडला असून यात आजी-माजी पुरुष क्रिकेटरही आघाडीवर आहेत. हिंदुस्थानचा माजी विस्फोटक खेळाडू विरेंद्र सेहवाग यानेही सोशल मीडियावर पोस्ट करत ऑस्ट्रेलियाला डिवचले आहे.
‘ऑस्ट्रेलियाला वाटत होते की आणखी एक सेमीफायनल आरामात जिंकू आणि फायनलमध्ये पोहोचू. पण आपल्या मुलींना विचार केला की खरा धमाका करण्याची हीच वेळ आहे. सर्व टीकाकारांची धुलाई केली. काय खेळ दाखवला. तुमचा खूप अभिमान वाटतो’, असे ट्विट सेहवागने केले आहे.
ऑस्ट्रेलियाला वाटले की ही आणखी एक उपांत्य फेरी आहे, आरामात जिंकली आणि अंतिम फेरी गाठली – आमच्या मुलींना वाटले की ही त्यांच्यासाठी खरी स्प्लॅश करण्याची संधी आहे! सर्व टीका बाजूला ठेवा. तुम्ही कोणता खेळ दाखवत आहात? निळ्या रंगाच्या आमच्या स्त्रियांचा अभिमान आहे. pic.twitter.com/oX5BfWK3PM
— वीरेंद्र सेहवाग (@virendersehwag) 30 ऑक्टोबर 2025
सचिनने केले कौतुक
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही या ऐतिहासिक विजयाबद्दल हिंदुस्थानच्या महिला संघाचे अभिनंदन केले. दमदार वीज. जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत कौर यांनी आघाडीवर राहून संघाला दिशा दाखवली. श्री चरणी आणि दीप्तीनेही दमदार गोलंदाजी करत सामना जिवंत ठेवला, असे सचिनने म्हटले.
अप्रतिम विजय! 🇮🇳
चांगले केले @जेमीरॉड्रिग्ज आणि @इमहरमनप्रीत आघाडीतून नेतृत्व केल्याबद्दल. श्रीचरणी आणि @दीप्ती_शर्मा०६तुम्ही चेंडूने खेळ जिवंत ठेवला.
तिरंगा उंच फडकवत रहा. 💙 🇮🇳 pic.twitter.com/cUfEPwcQXn
— सचिन तेंडुलकर (@sachin_rt) 30 ऑक्टोबर 2025
 
			 
											
Comments are closed.