वीरेंद्र सेहवाग अन् पत्नी आरतीने ग्रे डिवोर्स घेतल्याची चर्चा; Grey Divorce म्हणजे नेमकं काय?
वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती अहलावत: भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwagh) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. वीरेंद्र सेहवाग आणि पत्नी आरती अहलवात (Aarti Ahlawat) गेल्या काही दिवसांपासून वेगळे राहत असल्याची मागिती समोर आली होती. दोघांमध्ये मतभेद असल्याने वीरेंद्र सेहवाग आणि आरतीने ग्रे डिवॉर्स घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
‘ग्रे डिवोर्स’ म्हणजे नेमकं काय? (Grey Divorce Means What)
‘ग्रे डिवोर्स’ म्हणजे, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमधील घटस्फोट किंवा वेगळं होणं. अनेकदा ही परिस्थिती आयुष्याचा सर्वाधिक काळ एकत्र राहिल्यावर उद्भवते. काही प्रकरणांमध्ये जोडपी कायदेशीररित्या घटस्फोट घेत नाहीत, तर फक्त वेगळं राहण्याचा पर्याय निवडतात. मग ते त्यांच्या घरात राहत असोत किंवा त्यांच्या मुलांसोबत. ‘ग्रे डिवोर्स’ला ‘सिल्व्हर स्प्लिटिंग’ असेही म्हणतात. जेव्हा दीर्घकाळ लग्न केलेल्या आणि साधारणपणे ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या जोडप्याचा घटस्फोट होतो, तेव्हा त्याला ‘ग्रे डिव्होर्स’ म्हणतात. दरम्यान, Grey Divorce हा पूर्वी अनेकांनी घेतला आहे. सुपरस्टार कमल हसन आणि सारिका ठाकूर, बॉलिवूड अभिनेता अरबाज खान-मलायका आरोरा, आमिर खान, कबीर बेदी, आशिष विद्यार्थी आणि इतरांनी ‘ग्रे डिवोर्स’घेतला आहे.
वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत यांचा 2004 मध्ये विवाह- (Virender Sehwagh Wife News)
वीरेंद्र सेहवाग हा त्यांच्या मैदानावर फटकेबाजीमुळे संपूर्ण देशाला परिचित आहे. वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत यांचा 2004 मध्ये विवाह संपन्न झाला होता.शिवाय लग्न झाल्यानंतर सेहवागला दोन मुलं देखील झाली आहेत. सेहवागला पहिला मुलगा 2007 मध्ये झाला होता. त्याचं नाव आर्यवीर असं ठेवण्यात आलं होतं. तर 2010 मध्ये सेहवागच्या पत्नीने दुसऱ्या मुलाची गोड बातमी आली होती. त्याचं नाव सेहवागने वेदांत असं ठेवलं होतं. दोन्ही मुलं क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी सराव करत आहेत. दरम्यान, तब्बल 20 वर्षे सोबत घालवल्यानंतर सध्या वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
कोण आहे आरती अहलावत? (Who Is Aarti Ahlawat)
वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती अहलावत ही मूळची नवी दिल्लीची आहे. 16 डिसेंबर 1980 रोजी आरतीचा जन्म झाला. चहलच्या पत्नीप्रमाणे सोशल मीडियावर आरती फार चर्चेत नसते. तिने कॉम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा पूर्ण केलाय. त्यापूर्वी तिने लेडी इर्विन माध्यमिक विद्यालय आणि भारतीय विद्या भवन येथे शिक्षण घेतलंय.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.