वीरेंद्र सेहवागची पत्नी बीसीसीआयच्या अध्यक्षांना करतेय डेट?; कोण आहे आरती अहलावत?


भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwagh ) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता वीरेंद्र सेहवागची पत्नी देखील सोशल मीडियावरील एका दाव्यामुळे चर्चेत आली आहे. वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती अहलवात (Aarti Ahlawat) सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मन्हास (Mithun Manhas) यांना डेट करत असल्याची अफवा पसरली आहे. तसेच मिथुन मन्हास आणि आरतीचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. मात्र सदर अफवांना दुजोरा देणारा कुठलाही सबळ पुरावा अद्याप समोर आलेला नाहीय.

मिथुन मन्हास (Mithun Manhas) यांची नुकतीच बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नेमणूक झालीय. तसेच वीरेंद्र सेहवाग आणि मिथुन मन्हास हे दोघं चांगले मित्रही आहेत. मात्र याचदरम्यान, आरती अहलवात आणि मिथुन मन्हास (Mithun Manhas And Aarti Ahlawat) एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरल्याने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. वीरेंद्र सेहवाग आणि आरती गेल्या काही दिवसांपासून वेगळे राहत असल्याची मागिती समोर आली होती. दोघांमध्ये मतभेद असल्याने वीरेंद्र सेहवाग आणि आरतीने वेगळा राहण्याचा निर्णय घेतला.

वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत यांचा 2004 मध्ये विवाह- (Virendra Sehwagh Wife News)

वीरेंद्र सेहवाग हा त्यांच्या मैदानावर फटकेबाजीमुळे संपूर्ण देशाला परिचित आहे. वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत यांचा 2004 मध्ये विवाह संपन्न झाला होता.शिवाय लग्न झाल्यानंतर सेहवागला दोन मुलं देखील झाली आहेत. सेहवागला पहिला मुलगा 2007 मध्ये झाला होता. त्याचं नाव आर्यवीर असं ठेवण्यात आलं होतं. तर 2010 मध्ये सेहवागच्या पत्नीने दुसऱ्या मुलाची गोड बातमी आली होती. त्याचं नाव सेहवागने वेदांत असं ठेवलं होतं. दरम्यान, तब्बल 20 वर्षे सोबत घालवल्यानंतर सध्या वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

कोण आहे आरती अहलावत? (Who Is Aarti Ahlawat)

वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती अहलावत ही मूळची नवी दिल्लीची आहे. 16 डिसेंबर 1980 रोजी आरतीचा जन्म झाला. चहलच्या पत्नीप्रमाणे सोशल मीडियावर आरती फार चर्चेत नसते. तिने कॉम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा पूर्ण केलाय. त्यापूर्वी तिने लेडी इर्विन माध्यमिक विद्यालय आणि भारतीय विद्या भवन येथे शिक्षण घेतलंय.

मिथुन मन्हास कोण आहेत? (Who is BCCI President Mithun Manhas)

45 वर्षीय मिथुन मन्हास यांनी भलेही टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले नसेल, तरीही त्यांचा घरेलू क्रिकेटमधील विक्रम उल्लेखनीय आहे. त्यांनी 157 फर्स्ट-क्लास सामन्यांत तब्बल 9714 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 27 शतके आहेत. लिस्ट-ए क्रिकेटमध्येही त्यांनी आपली छाप सोडताना 4126 धावा केल्या आहेत. दिल्ली रणजी संघाचा कर्णधार म्हणून मन्हास यांनी अनेक वर्षे संघाचे नेतृत्व केले आणि अनेकदा कठीण प्रसंगी संघाला विजय मिळवून दिला.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

संबंधित बातमी:

Aarti Sehwag Mithun Manhas Affair:: बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मन्हासमुळे सेहवागच्या खासगी आयुष्यात वादळ? पत्नीसोबतचा तो फोटो व्हायरल झाल्याने पुन्हा चर्चा रंगली!

आणखी वाचा

Comments are closed.