साहित्यावर प्रेम करणारा मी; कुणाचे कशाला काय चोरू; विश्वास पाटील यांचे आरोपांना उत्तर
माझ्या कादंबऱया मी चौर्यकर्म करून लिहिल्या असं जे म्हणतात, त्यांना मला सांगायचं आहे, मी दहा हजार पाने लिहिली आहेत, माझी बोटे वाकडी झाली आहेत. मी मनापासून साहित्यावर प्रेम करतो. मी कुणाचे कशाला काय चोरू? मी श्रमिकांचे कष्ट कादंबरीतून मांडत आलो आहे, असे स्पष्टीकरण 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलानेच नवनिर्वाचित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिले आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष विश्वास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनिस, महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीताराजे पवार उपस्थित होते. सत्कारापूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांच्या या निवडीवर काही संघटनांनी घेतलेले आक्षेप त्यांनी फेटाळून लावले.
विश्वास पाटील म्हणाले, जातीविषयी आणि कॉण्ट्रोव्हर्सी करून मी अडकेन का यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यामध्ये माझी दोन वाक्ये ट्वीस्ट करण्यात आली. मी कृषक म्हणजे शेतीच्या व्यवसायामध्ये इतर प्रांतामध्ये ज्या जाती आहेत, त्याविषयी मी बोललो होतो, यामध्ये दलित किंवा पदलीत यांचा संबंध नव्हता, त्यामुळे ते ट्वीस्ट करण्यात आले. मी आरक्षणावर बोललो नाही, हैदराबाद गॅझेटवर बोलत होतो, मी जातीयवादाचा कुठेही उल्लेख केला नाही.
ते म्हणाले, माय मराठीवर चहू बाजूने हल्ले झाले आहेत. त्यासाठी अध्यक्ष म्हणून मी ठोस पावले उचलणार आहे. शिवाय युवा साहित्यिकांनी ग्रंथ लेखनाकडे वळावं यासाठी प्रयत्न केले जातील.
माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ
छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी लिहिल्या मजकुराबद्दल पाटील म्हणाले, 2006 साली माझी संभाजी कादंबरी आली2 लाखांहून त्याच्या प्रती खपल्या आहेत? संभाजी महाराज यांनी औरंगजेबाशी पराकोटीचा संघर्ष केला हे मी माझ्या कादंबरीतून घराघरात पोहोचवले, पण चुकीचा अर्थ काढला जात आहे?
…अन् सस्पेन्शन थांबले
झाडाझडती कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर मंत्रालयातील एका कारकुनाने माझी मुख्य सचिवांकडे तक्रार केली? सरकारी कर्मचारी असताना सरकारच्या विरोधात या कादंबरीत लिखाण करण्यात आल्याचा माझ्यावर आरोप झाला? यानंतर लगेचच माझा रावसाहेब कसबे यांनी विखे–पाटील यांच्याकडे सत्कार ठेवला? नंतरच्या काळात झाडाझडतीला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला? माझी लोकप्रियता पाहता कारवाई करणे सरकारला परवडणारे नव्हते, त्यामुळे माझे सस्पेशन थांबविण्यात आल्याचा किस्सा पाटील यांनी सांगितला?
Comments are closed.