विठ्ठलभक्तीत रममाण संत लिंबाई

संत नामदेवांची मुलगी लिंबाई यांचा जन्म व समाधी असा कोणताही काळ उपलब्ध नाही. त्यांचे जन्मठिकाण पंढरपूर होते. संत नामदेवांच्या सहवासात सर्व मुले-मुली असल्याने, त्यांच्या विठ्ठलभक्तीने प्रभावित झालेली आहेत. नारा, विठा, गोंदा, महादा यांच्यात धाकटी मुलगी संत लिंबाई होय. संत लिंबाईच्या अभंगरचनेवर नामदेवांचा प्रभाव आहे. संत लिंबाई विठ्ठलभक्तीत असताना विठ्ठलावर टाकलेला विश्वास स्पष्ट करताना त्या म्हणतात, ‘त्याचिया वचनाचा पावोनि विश्वास धरली तुझी कास पांडुरंगा।। नामयाची लेकी लिंबाई म्हणे देवा । कृपाळू केशवा सांभाळावे।।

संत लिंबाई आपल्या मनातील भक्तिभाव साध्या पद्धतीने अभंगरचनेतून व्यक्त करताना दिसतात. त्यांचे केवळ दोन अभंग उपलब्ध आहेत. संत नामदेव कुटुंबातील सर्वच स्त्राr संतांचा जन्मकाळ, ठिकाण उपलब्ध नाही. संत नामदेवांच्या पारमार्थिक जीवनाचा आणि अभंगवाणीतील विचारांचा प्रभाव त्यांच्या कुटुंबातील सर्व संतमंडळींवर पडलेला दिसतो. तो त्यांच्या परिवारातील स्त्राr संतांच्या अभंगरचनेवरून जाणवतो. आई संत गोणाई, पत्नी संत राजाईप्रमाणेच संत नामदेवांची बहीण संत आऊबाई, मुलगी संत लिंबाई, सून संत लाडाई, साखराई आणि पुतणी नागी (संत नागरी) यांच्या अनेक अभंगरचना असाव्यात. मात्र, त्या काळाच्या प्रवाहात नष्ट झालेल्या आहेत. अर्थात आज प्रत्येक स्त्राr संताच्या रचना (संत नामदेव परिवार) संख्येने अतिशय कमी आहेत.

Comments are closed.