आषाढी एकादशीनिमित्त ‘विठ्ठलमयी स्वरवंदना’
आषाढी एकादशीनिमित्त ‘भक्तीरस’ विठ्ठलमयी स्वरवंदना या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वरनिनाद फाऊंडेशन, वीर सेनानी फाउंैडेशन आणि शार्जी प्रॉडक्शन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केला आहे.
भक्तीरस कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्राrय गायक पद्मश्री पं. व्यंकटेश कुमार आणि स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांचा दुर्मिळ सांगीतिक साक्षात्कार अनुभवायला मिळणार आहेत. तसेच डॉ. चारुदत्त आफळे महाराजांचे निरूपण देखील होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उपस्थितांनी केले आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात शनिवार, 25 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ः शैलेश सामंत – 9819965444 / 9833517501.
Comments are closed.