सुपर सनी मंथ क्रीडा महोत्सवात मिलेनियम नॅशनल स्कूलने मुलींच्या व्हॉलिबॉल स्पर्धेचे विजेतेपद जिंकले

पुणे, 19 फेब्रुवारी 2026: युवा सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित “सुपर सनी मंथ” या क्रीडा महोत्सवाअंतर्गत जिल्हास्तरीय १४ वर्षांखालील मुले आणि मुलीसाठी आंतर शालेय निमंत्रित व्हॉलिबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात मिलेनियम नॅशनल स्कूल संघाने, तर, मुलांच्या गटात संत तुकडोजी विद्यालय या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
डेक्कन जिमखाना व्हॉलिबॉल मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात मिलेनियम नॅशनल स्कूल संघाने सिंबायोसिस स्कूल संघाचा 25-19, 25-15 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मिलेनियम नॅशनल स्कूल संघाकडून ब्लॉकर रमा पाठक हिने सुरेख खेळी केली. तर पराभुत संघाकडून राधा कासखेडीकर हिने दिलेली लढत अपुरी ठरली.
तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत विद्या प्रतिष्ठान स्कूल, बारामती संघाने सेंट हेलेनाज स्कूल संघाचा 25-15, 25-03 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.
मुलांच्या गटात अंतिम सामन्यात संत तुकडोजी विद्यालय संघाने बारामती इंग्लिश मिडीयम(किरण) स्कूल संघाचा 25-08, 25-09 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. सामन्यात संत तुकडोजी विद्यालय संघाकडून सुमित कबाडे याने काउंटर अटक करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर, बारामती इंग्लिश मिडीयम(किरण) स्कूलकडून सेटर अनिकेत वाबळे याने दिलेली लढत अपुरी ठरली.
याआधीच्या उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात संत तुकडोजी विद्यालय संघाने न्यु इंग्लिश स्कूल(खंडाळा) संघाचा 25-18, 25-18 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. विजयी संघाकडून सुमित कबाडे, ओमराज चव्हाण यांनी चांगली कामगिरी केली. दुसऱ्या लढतीत बारामती इंग्लिश मिडीयम(किरण) स्कूल संघाने नालंदा स्कूल संघाचा 25-22, 22-25, 15-09 असा तीन सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक व एकूण 1,00,000रुपयांची रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोमेश्वर फाउंडेशनच्या संचालिका मधुरा निम्हण, आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक वैशाली फडतरे, गीतांजली बहिरट आणि युवा उद्योजक धीरज बालवडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय व्हॉलिबॉल प्रशिक्षक देविदास जाधव, ऍड. संदेश गुंडगे, डेक्कन जिमखानाचे व्हॉलिबॉल विभागाचे सचिव किशोर पठारे, छत्रपती पुरस्कर्ते गोपाल मिरजकर, पुणे विभागीय सचिव विलास घोगरे, राजेंद्र कदम, स्पर्धा समन्वयक अभिजीत मोहिते, डॉ. सचिन तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: मुले: उपांत्य फेरी:
संत तुकडोजी विद्यालय वि.वि.न्यु इंग्लिश स्कूल(खंडाळा) 25-18, 25-18;
बारामती इंग्लिश मिडीयम(किरण) स्कूल वि.वि.नालंदा स्कूल 25-22, 22-25, 15-09;
शेवटची फेरी:
संत तुकडोजी विद्यालय वि.वि.बारामती इंग्लिश मिडीयम(किरण) स्कूल 25-08, 25-09;
तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी लढत:
न्यु इंग्लिश स्कूल(खंडाळा) वि.वि.नालंदा स्कूल 25-19, 22-25, 15-13;
मुली: अंतिम फेरी:
मिलेनियम नॅशनल स्कूल वि.वि.सिंबायोसिस स्कूल 25-19, 25-15;
तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी लढत:
विद्या प्रतिष्ठान शाळा, बारामती विद्यापीठ, सेंट हेलेन्स स्कूल 25-15, 25-03;
इतर पारितोषिके
मुले:
बेस्ट अटॅकर: शंभू पिसाळ
सर्वोत्कृष्ट ब्लॉकर : आर्यन सहानी
बेस्ट सेंटर: अनिकेत वाबळे;
वाढवणारा खेळाडू: यजन अत्तार
मुली:
सर्वोत्कृष्ट अटॅकर : राधा कासखेडीकर आणि आराध्या हसबनीस
सर्वोत्कृष्ट ब्लॉकर : अपेक्षा पवार
बेस्ट सेटर : राधिका
वाढवणारा खेळाडू : रामा फाटक.
Comments are closed.