आता युक्रेन युद्धही थांबवा, झेलेन्स्की यांचे साकडे

इस्रायल-हमासमध्ये शांतता करार होऊन गाझातील युद्ध थांबल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गाझा प्रमाणेच आता युक्रेन आणि रशियातील युद्धही थांबवा, असे आवाहन झेलेन्स्की यांनी जागतिक समुदायाला केले आहे.

झेलेन्स्की यांनी ’एक्स’वर पोस्ट केली आहे. मध्य पूर्वेतील युद्ध संपले आहे. ही शांतता प्रक्रिया आता थांबता कामा नये. युरोपातील संघर्षही थांबवता येऊ शकतो. यात अमेरिका व अन्य देशांचे नेते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. युद्ध थांबवण्यासाठी रशियाची रसद तोडणे गरजेचे आहे, असे झेलेन्स्की म्हणाले.

Comments are closed.