अमेरिकेने हिंदुस्थानवर लावलेला टॅरिफ योग्यच!

हिंदुस्थानवर जबर टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प सरकारचा निर्णय योग्यच आहे, असे म्हणत युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी हिंदुस्थानला धक्का दिला आहे. रशियाला बळ देणाऱ्या देशाविरोधात अमेरिका कठोर पाऊल उचलत असेल तर त्यात चुकीचे काय आहे. रशियाशी व्यापार करणाऱ्या देशांवर बंदी घालणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. रशियावरील आर्थिक निर्बंधांचेही त्यांनी स्वागत केले. पुतीन यांना कसे रोखायचे हे ट्रम्प यांना चांगले माहीत आहे. तेल आणि वायू विकून रशिया पैसा कमावतो. तीच त्यांची ताकद आहे. त्यावरच घाव घालायला हवा, असे झेलेन्स्की म्हणाले.
Comments are closed.