राष्ट्रीय हितापेक्षा मतदान महत्त्वाचे – अब्दुल्ला
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे राष्ट्रगान ‘वंदे मातरम्’च्या रचनेचा शतकोत्तर अमृतमहोत्सव देशभर साजरा केला जात आहे. मात्र, जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या प्रदेशात हा कार्यक्रम साजरा करण्याला विरोध दर्शविला आहे. जम्मू-काश्मीमधील शाळा आणि शिक्षणसंस्थांमध्ये ‘वंदे मातरम्’ म्हणणे अनिवार्य केले जाऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने ओमर अब्दुल्ला यांच्यावर जोरदार टीकाप्रहार केले आहेत.
अब्दुल्ला केवळ लांगूलचालनाचे राजकारण करीत आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केला आहे. ‘वंदे मातरम्’ म्हणण्याची सूचना हा जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरुन करण्यात येणारा हस्तक्षेप आहे, हा ओमर अब्दुल्ला यांचा आरोप त्यांचे लांगूलचालनाचे धोरण दर्शविणारा आहे. मतपेढीला खूष ठेवण्यासाठी आजही काही नेते ‘वंदे मातरम्’ला विरोध करीत आहेत. या गीतातील अनेक कडवी नेहरुंनी मुस्लीम लीगला दबावाखाली घेतला होता. आज अब्दुल्ला हेच करीत आहेत, असा आरोप पूनावाला यांनी केला आहे.
Comments are closed.