24 ऑक्टोबर रोजी 5 राज्यसभेच्या जागांसाठी मतदान

काश्मीरमधील 4, पंजाबमधील एका जागेचा समावेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जम्मू काश्मीरमधील चार आणि पंजाबमधील एका अशा एकंदर पाच जागांसाठी बुधवारी निवडणूक प्रक्रियेची घोषणा करण्यात आली. या निवडणुका 24 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी सुरू होईल. या जागांसाठी अधिसूचना 6 ऑक्टोबर रोजी जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर असेल आणि 16 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.

काश्मीरमधील राज्यसभेच्या जागा फेब्रुवारी 2021 पासून रिक्त असून आता निवडणूक आयोगाने त्यांच्यासाठी पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. गुलाम नबी आझाद, शमशेर सिंग मनहास, नजीर अहमद लावे आणि फयाज अहमद मीर – यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ह्या जागा रिक्त झाल्या होत्या. त्यावेळी जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट असल्यामुळे तेथे निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या.

Comments are closed.