शेवटी वाजत खानला पश्चिम बंगालमधून अटक झाली
धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कारवाई
वृत्तसंस्था / कोलकाता
हरियाणातील शर्मिष्टा पनोली या इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सरच्या विरोधात धर्मभावना दुखाविल्याची तक्रार करणारा वजाहत खान याला पश्चिम बंगाल पोलिसांनी अखेर सोमवारी अटक केली. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आणि सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पण्या केल्याबद्दल वजाहत खान याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. आसाम पोलिसांचे एक पथक वजाहत खान याच्याविरुद्ध अटक वॉरंट घेऊन कोलकाता येथे पोहोचले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता.
शर्मिष्टा पनोली या इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सरच्या विरोधात धर्मभावना दुखाविल्याची तक्रार करणारा वजाहत खान याच्यावर गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. धर्मभावना दुखावणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. वजाहत खान हा कोलकाता येथील रशिदी फाऊंडेशन या संस्थेचा सहसंस्थापक आहे. त्याने अन्य धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर अशी पोस्ट टाकून त्याने पलायन केले होते. त्याने सादर केलेल्या तक्रारीवरूनच शर्मिष्टा पनोली हिला कोलकाता पोलिसांनी अटक केली होती.
आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्मा यांनी वजाहत खान याला आसाम पोलिसांच्या आधीन करावे अशी मागणी केली आहे. त्याने कामाख्या देवीची निंदा करुन हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्याच्या विरोधात आसाममध्ये तक्रार सादर करण्यात आली आहे. आसाम पोलीसही त्याचा शोध घेत होते. निंदाजनक आणि प्रक्षोभक पोस्ट टाकून तो बेपत्ता झाला होता.
Comments are closed.