जागे व्हा, निवडणूक जिंकली नाही चोरली! म्हणत संजय राऊत यांची खणखणीत पोस्ट

देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये झालेला पराभव हा भाजपने केला नाही तर, निवडणूक आयोगाने केल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी फेसबुकवर पोस्ट करुन म्हटले आहे. पोस्टमध्ये राऊत यांनी निवडणूक आयोगासह सरकारी यंत्रणांवर तिखट शब्दांत भाष्य केले आहे.

संजय राऊत यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटले की पश्चिम बंगाल, तृणमूल काॅंग्रेस यांचा पराभव भाजपने नाही तर निवडणूक आयोगाने केलेला आहे. त्याचबरोबरीने केंद्रीय सुरक्षा दलांनी (CAPF) हा पराभव केला आहे. ही निवडणूक जिंकली गेली नाही तर चोरली गेली आहे असे म्हणत त्यांनी पोस्टच्या माध्यमातून या सर्व यंत्रणांवर सडकून टीका केली आहे.

सुमारे तीस लाख मतदारांना मतदानाचा हक्क नाकारल्याने हा पराभव झालेला आहे. या अशाच पद्धतीने, महाराष्ट्र, बिहार, हरियाणा, आसाम, ओरिसामध्ये निवडणूका जिंकण्यात आल्या आहेत. निवडणूक चोरली गेली आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे. या प्रसंगात ममतादीदींसोबत आपण उभे राहायला हवे असेही त्यांनी म्हटले आहे. मोदी सरकारवर शरसंधान साधत राऊत म्हणाले, या अशा विजयाचे ढोल हे फुटायला हवेत याकरता सर्वांनी जागे व्हायला हवे.

Comments are closed.