मुंबईच्या महिला कर्णधारांच्या सन्मानाची भिंत उभी, आगामी महिला वर्ल्ड कपनिमित्त एमसीएची अनोखी भेट

हिंदुस्थानच्या महिला क्रिकेटची खरी ताकद असलेल्या मुंबई संघांच्या महिला कर्णधारांच्या छायाचित्रांनी सजलेली विशेष भिंत उभारत मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) त्यांच्या अभूतपूर्व योगदानाला अनोखा सलाम केला आहे. आगामी आयसीसी वर्ल्ड कपच्या निमित्ताने एमसीएने आपल्या दिग्गज महिलांनी ही अनोखी भेट दिली.

आज मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील एमसीए शरद पवार इनडोअर क्रिकेट अकादमीत मुंबईच्या महिला कर्णधारांच्या छायाचित्रांची भिंत उभारण्याचा उपक्रम राबविला. या कार्यक्रमाला एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक, अॅपेक्स काwन्सिलचे सदस्य तसेच आंतरराष्ट्रीय व स्थानिक महिला क्रिकेटपटू उपस्थित होते. या भिंतीद्वारे केवळ अग्रणी खेळाडूंचा गौरवच नव्हे, तर भावी पिढय़ांना प्रेरणा देण्याचा संदेश देण्यात आला आहे. सन्मान भिंत अनावरणाचा हा सोहळा आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप मुंबईत आगमन झाल्याच्या औचित्याने रंगला. या ट्रॉफीचे जोरदार स्वागत करत महिला क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न केला गेला.

मुंबईचे क्रिकेट हे नेहमीच हिंदुस्थानी महिला क्रिकेटला आघाडीवर नेणारे स्थान राहिले आहे. 1978मध्ये जेव्हा हिंदुस्थानने पहिल्यांदाच महिला विश्वचषक गाठला, तेव्हा मुंबईकर डायना एडुल्जी या संघाच्या कर्णधार होत्या. ही परंपरा पुढे नेत यंदाच्या 13व्या विश्वचषक स्पर्धेत जेमिमा रॉड्रिग्ज हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार आहे, तर सायली सातघरे राखीव खेळाडूंमध्ये निवडली गेली आहे.

Comments are closed.